Breaking

सोमवार, २४ जून, २०२४

बेंबळे येथे मंडप चे खांब काढत असताना घोटी येथील युवकाचा मृत्यू



बेंबळे येथे मंडप चे खांब काढत असताना  घोटी येथील युवकाचा मृत्यू
टेंभुर्णी प्रतिनिधी :-
घोटी तालुका माढा येथील अहमद अल्लाउद्दीन शेख वय 43 वर्ष राहणार घोटी याचा विजेचा शॉक बसल्याने मृत्यू झाला असून याबाबत समजलेली माहिती अशी की, दिनांक 24 6 2024 रोजी दुपारी दोन वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान बेंबळे येथे माणिक भागवत कोकाटे राहणार बेंबळे, तालुका माढा यांच्या घरी वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम होता वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी मंडपाचे लोखंडी पाईप उभा केलेले होते ते मंडपाचे लोखंडी पाईप काढत असताना मंडपाजवळ असलेल्या लाईटच्या तारास मंडपाचा लोखंडी पाईप लागून मंडप चे काम करणारी महंमद अल्लाउद्दीन शेख वय 43 वर्षे राहणार घोटी, तालुका माढा यास इलेक्ट्रिक विद्युत तारेचा करंट लागला असता त्यास उपचाराकरिता जय श्री हॉस्पिटल टेंभुर्णी तालुका माढा येथे दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा 5:45 वाजता मृत्यू झाला मयत अहमद हे मंडपाचे काम करीत होता त्यांच्याकडून मंडपाचा लोखंडी पाईप लाईटच्या तारास लागल्याने त्यास करंट लागून तो मयत झाला आहे तरी मयत अहमद शेख याच्या विषयी आमची कोणाविरुद्ध काही तक्रार नाही अशा स्वरूपाची माहिती मताचे भाऊ रहमान अल्लाउद्दीन शेख यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे दिली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शिंदे साहेब हे करीत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा