टेंभुर्णी : - माढा तालुक्यातील अकोले-खुर्द येथील शेतमजुराचा मुलगा आकाश बापू पवार याने स्पर्धा परीक्षेतून ग्रामसेवक पदावर झेप घेतली आहे.
आकाश पवार यांचे प्राथमिक व माध्य. शिक्षण जि.प.शाळा अकोले खुर्द व माध्यमिक शिक्षण बबनराव शिंदे विद्यालयात झाले.तसेच विद्या प्रतिष्ठान कॉलेज बारामती येथे बारावी झाली.त्याने पुणे येथील पीव्हीजी कॉलेज मधून इंजि.पदवी मिळविली.
आकाश पवार हा पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.त्यास छत्रपती संभाजी नगरचे सहा.पोलीस आयुक्त धनंजय पाटील,बेंबळी (लातुर) पोलीस स्टेशनचे सपोनि गणेश पाटील,अकोले खुर्द चे प्रगतशील बागायतदार नागनाथ नवले यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक नारायण भानवसे,चोपडा (जळगाव) पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकस कावेरी कमलाकर,पोकॉ.मनोज बागडे आदीनी अभिनंदन केले आहे.
आकाश पवार याचे स्पर्धा परिक्षेमधून अधिकारी होण्याचे ध्येय आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा