Breaking

शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन योग्य ती ठेकेदारावरती कारवाई करावी छत्रपती संभाजी महाराज... अन्यथा आंदोलन*.




*शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन योग्य ती ठेकेदारावरती कारवाई करावी छत्रपती संभाजी महाराज... अन्यथा  आंदोलन*



रांझणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विविध मागण्यासाठी सलग चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू 


पहिल्या दिवशी उपोषणकर्त्यांनी गळ्यापर्यंत घेतले स्वतःला पुरून.


टेंभुर्णी/ प्रतिनिधी 

मौजे भिमानगर ते रांझणी, आलेगाव बुद्रुक, रुई,आलेगाव खुर्द,गार अकोले,टाकळी टे ,चांदज, आढेगाव हा ग्रामीण मार्ग क्रमांक 128 असून हा रस्ता 5.500 मीटर करणे तसेच भिमानगर चौक ते एनटीपीसी पंप हाऊस उजनी टे रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम चालू असून त्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणे बाबत व उजनी टे एनटीपीसी पंपाऊस जाणार्या रस्त्यात या झाडांची नुकसान भरपाई मिळावी आणि भिमानगर चौक येथे सर्विस रोड होऊन कॅनॉल वरती पूल टाकावा या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरण उपोषण सुरू आहे.
 या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून या आंदोलनाला छत्रपती संभाजी महाराज त्यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोनवरून रांजणी भिमानगर चौकात बसलेल्या शेतकरी आंदोलनाची तातडीने दखल घेऊन स्थानिक ठेकेदार व इतरावर कारवाई करावी या भागातील शेतकरी संघटनेला व शेतकऱ्यांना ज्ञाय देवा..अन्यथा आम्हाला आंदोलन उतरावे लागेल व सरकारला जाब विचारावा लागेल असा छत्रपती संभाजी राजेंनी इशारा दिला आहे या उपोषण ठिकाणी सर्व थरातून राजकीय विविध संघटनाचे पदाधिकारी यांनी भेटी देण्यास चालू असून आज दुपारी माढा विधानसभेसाठी इच्छुक असणारे 
 अभिजित पाटील, संजय कोकाटे, शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी  भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व पाठिंबा दिला तसेच ॲड बाळासाहेब पाटील वरवडे, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तालुका अध्यक्ष औदुंबर देशमुख, इतिहासकार श्रीमंत कोकाटे सर,भारत नाना पाटील,  हरिभाऊ माने, राष्ट्रवादीचे मयूर काळे,

समाधान अनपट,पै.गणेश पाटील, सुरेश पाटील, संजय सोनवणे, नारायण गायकवाड,दिलीप पाटील, बाळासाहेब पाटील,यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे.

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शासन वेळोवेळी खोटी आश्वासने देत असून आमच्या मागण्या ह्या रस्ता असून कामाचा दर्जा चांगला असावा व ठेकेदार आणि प्रशासन यांची मिली भगत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत पाटील म्हणाले.
 एनटीपीसी पंपाहाऊस उजनी टे येथे जाणारा रस्ता हा काळी माती काढून रस्त्यावर खडीकरण करणे अपेक्षित असताना ठेकेदाराने हा रस्ता फूटभर उकरून रस्त्यावरच काँक्रिटीकरण केले आहे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून तसेच ग्रामीण मार्ग 128 चे नूतनीकरण चालू असून 5.500 मीटर मीटरने सरसकट काम करणे गरजेचे असताना या मार्गांनी रुई देवस्थान हे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असे देवस्थान आहे मंगळवार, शुक्रवार,रविवार लाखो भाविक या ठिकाणी रस्त्याने येजा करत असतात रांझणी देवस्थान पण याच रस्त्याला आहे तसेच हजारो विद्यार्थी शाळेसाठी याच रस्त्याने येजा करतात.तसेच या रस्त्याला भरपूर गावे, कारखाने, मंगलकार्यालय असून हा रस्ता पुढे नरसिंगपूर देवस्थान या रस्त्याला जोडला आहे परंतु या रस्त्याची तर खूप वाईट अवस्था आहे खूप निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून चालू पावसाळ्यात देखील हा रस्ता सहा महिने हि टिकणार नाही असे स्वाभिमानी शेतकरी चे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सांगितले तसेच उजनी टे येतील एनटीपीसी पंप हाऊस कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असणारी फळांची झाडे यांचा पंचनामा होऊन वर्ष झाले परंतु अध्यापही संबंधित शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही सतत उडवा उडवीचे उत्तरे मिळतात भिमाननगर चौक येथे डिव्हायडर साठी व सर्विस रोड साठी तीन वेळा आंदोलन करून देखील निर्णय होत नाही यासाठी तीन वेळा आंदोलन केले आहे.

हे अमरण उपोषण रांझणी पाटी येथे सुरू आहे.याठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष प्रताप पिसाळ, विठ्ठल मेटे,जिवनदास मेटे, नानासाहेब मेटे,जोतिराम मेटे, विष्णू पाणबुडे, बाळासाहेब पाणबुडे, पै.रमेश पाटील, हे उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा