Breaking

सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा अंतिम हप्ता 100 रूपये बँक खात्यात जमा**जिल्ह्यात उच्चांकी दर देणेची परंपरा कायम*



*विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा अंतिम हप्ता 100 रूपये बँक खात्यात जमा*

*जिल्ह्यात उच्चांकी दर देणेची परंपरा कायम*
 टेंभुर्णी प्रतिनिधी:- भारत जगताप 

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याकडे ऊस गाळप हंगाम 2023-24 मध्ये गाळपास आलेल्या ऊसास प्रति टन 100 रूपये प्रमाणे अंतिम हप्ता शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करणेत आला असल्याची माहीती संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

 

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की,  विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 गळीत हंगामामध्ये युनिट नं.1 कडे 18 लाख 92 हजार 949 मे.टन ऊसाचे गाळप होवून 11 टक्के साखर उता-याने 19 लाख 28 हजार 850 क्विंटल साखर पोती उत्पादीत झाली आहेत. तसेच युनिट नं.2 कडे 6 लाख 25 हजार 888 मे.टन ऊसाचे गाळप होवून 11.14 टक्के साखर उता-याने 6 लाख 63 हजार 900 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे. दोन्ही युनिट चे मिळून 25 लाख 18 हजार 837 मे.टन गाळप होवून 25 लाख 92 हजार 750 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे.

या हंगामात दोन्ही युनिट कडे गाळपास आलेल्या ऊसास हंगामाचे सुरूवातीपासून 10 दिवसाला ऊस बिलाचे पेमेंट केलेले आहे. या हंगामाचे सुरूवातीपासून 15 जानेवारी, 2024 पर्यत गळीतास आलेल्या ऊसास पहिला ॲडव्हान्स प्रती टन 2700/- रूपये प्रमाणे अदा करण्यात आला. त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी व मार्च मध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रती टन रू.50/-,रू.100/- व रू.150/- प्रमाणे वाढीव ऊस दर अदा केलेला आहे. सन 2024 चे दिवाळी सणासाठी सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांना प्रति टन रू.100/-प्रमाणे अंतिम हप्ता ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग करणेत आलेला आहे. या ऊस बिलापोटी कारखान्याने 22 कोटी 56 लाख बँकेत जमा केलेले आहेत.

 

चौकट-

गेले 20 वर्षात कारखान्याने सोलापूर जिल्ह्यात उच्चांकी ऊस दर देणेची परंपरा कायम ठेवली असून या ऊस दरामुळे गाळप हंगाम 2023-24 मध्ये दि.16 ते 31 जानेवारी, 2024 या कालावधीत गळीतास आलेल्या ऊसास आजअखेर प्रती टन 2950/- रूपये, दि.1 ते 29 फेब्रुवारी, 2024 मध्ये 3000/- रूपये प्रती टन व 1 मार्च,2024 पासून हंगाम अखेर पर्यंत गाळपास आलेल्या ऊसास प्रती टन 3050/- रूपये प्रमाणे ऊस दर मिळालेला आहे-आ.बबनराव शिंदे

 

चौकट-

गाळप हंगाम 2023-24 मध्ये दोन्ही युनिटकडील ऊस बिलासाठी एकूण 727 कोटी 83 लाख 69 हजार, 34 टक्के तोडणी वाहतूक फरक 36 कोटी 05 लाख व तोडणी वाहतूक बिलासाठी कमिशन सह 206 कोटी 46 लाख  अदा करणेत आलेले आहेत. या हंगामातील संपूर्ण ऊस बिले व तोडणी वाहतूक बिले अदा करणेत आलेली आहेत-आ.बबनराव शिंदे

चौकट-
कारखान्याचे दोन्ही युनिट कडील कामगारांना गाळप हंगाम 2023-24 संपलेनंतर एक महिन्याचा पगार बक्षिस म्हणून अदा करणेत आलेला आहे. कामगारांना दिवाळीसणासाठी दोन पगार बक्षिस म्हणून जाहीर करणेत आले आहेत. त्यापैकी एक पगार सप्टेंबर मध्ये कामगारांना अदा करणेत आलेला असून उर्वरीत एक पगार लवकरच अदा करीत आहोत. एकूण तीन पगार बक्षिस कामगारांना होत आहेत- आ.बबनराव शिंदे
सभासद व ऊस पुरवठादार शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, मुकादम, व्यापारी, मटेरियल पुरवठादार व इतर यांचेमध्ये विठ्ठलराव शिंदे कारखान्याविषयी विश्वासअर्हता असल्याने पुढील सन 2024-25 गळीत हंगामासाठी दोन्ही युनिटकडे शेतक-यांचे ऊस नोंदी देणेचे व वाहनमालक, मुकादम यांचे करार करणेची संख्या दिवसेनदिवस वाढत आहेत. आवश्यकतेनुसार यंत्रणेचे करार पुर्ण झाले असून धोरणानुसार त्यांना ॲडव्हान्स अदा करणेत आलेला आहे अशी माहीती संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

 

सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे,कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर  व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा