Breaking

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

*श्री कुमारस्वामी महाविद्यालयात विद्यार्थी संसदेची स्थापना*.



*श्री कुमारस्वामी महाविद्यालयात विद्यार्थी संसदेची स्थापना*.


   *औसा /प्रतिनिधी ज्ञानेश्वर सूर्यवंशी*.  


                               औसा येथील श्री कुमारस्वामी महाविद्यालय,औसा येथे विद्यार्थी संसदेची स्थापना करण्यात आली.यावेळी संसदेच्या विद्यार्थी सचिव पदी श्री.विवेक पंडित चाबुकस्वार याची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयातील सर्व वर्गातून गुणवत्तेनुसार विद्यार्थी प्रतिनिधी याची निवड करण्यात आली आहे. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.डॉ. कुसूम ढोणे,उपप्राचार्य प्रा.डॉ.युवराज धसवाडीकर,विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख प्रा.डॉ. बळवंत घोगरे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुधीर गरड,क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ. गणेश मनगीरे,रा.से.यो.प्रमुख प्रा.डॉ. अनिल कांबळे,तसेच सर्व वर्ग प्रतिनिधी,प्राध्यापक हे उपस्थित होते. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष परमपूज्य श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, संस्थेचे सचिव श्री.गिरीश पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.डॉ. कुसूम ढोणे,उपप्राचार्य प्रा.डॉ.युवराज धसवाडीकर यांनी विद्यार्थी सचिव व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा