Breaking

शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

अंतरवाली सराटी येथे रणजीत शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास दिली भेट*



*अंतरवाली सराटी येथे रणजीत शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास दिली भेट*

टेंभुर्णी प्रतिनिधी:- भारत जगताप 

गरजवंत मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावत चालली आहे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे आता तरी सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा असे आव्हान रणजित शिंदे यांनी केले. 

 आज दि. 21 सप्टेंबर अंतरवली सराटी येथे जाऊन  रणजित भैय्या शिंदे  यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले संघर्षयोद्धा .मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे पाटील यांच्या लढ्यात आम्ही सदैव त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.


याप्रसंगी समन्वयक गंगाधर नाना काळकोटे, संजय पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे,कान्हापुरीचे सरपंच प्रेम चव्हाण,  लोंढेवाडीचे सरपंच संतोष तात्या लोंढे, रणदिवेवाडीचे दिगंबर आप्पा इंगळे, जाधववाडीचे सरपंच अमोल चवरे, शिव विचार संघटनेचे अध्यक्ष विजयदादा खटके पाटील, सचिन पवार, गणेश व्यवहारे, बाबासाहेब मस्के, लक्ष्मण खचेऀ, गोरख शिंदे,भगवान फराडे, सुधीर चव्हाण, बाळासाहेब पवार, बापू पारखे,योगेश जाधव, निलेश कन्हेरे यांच्यासह इतर समाजबांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा