**आढेगाव न्यू इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये चि. अक्षय दत्तात्रय बंडगर यांची नूतन जवान SRPF मध्ये निवड झाल्याबद्दल सन्मान.**
आढेगाव दि.16 सप्टेंबर 2024 रोजी आढेगाव येथील चिरंजीव अक्षय दत्तात्रय बंडगर यांची महाराष्ट्र राज्याचे विशेष सशस्त्र पोलीस बल म्हणून म्हणजेच नूतन SRPF जवान मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा न्यू इंग्लिश मेडियम स्कूल आढेगाव येथे यथोचित असा मानसन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले मार्गदर्शक डॉ. सतीश ज्ञानदेव रुपनवर व ॲड दत्तात्रय रुपनवर यांच्या शुभहस्ते मानसन्मान करण्यात आला .SRPF जवान अक्षय बंडगर यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून मुलांना त्यांच्या यशाच्या शिखरावर जाताना आलेले अनुभव सांगितले तर अध्यक्ष डॉ. सतिश रूपनवर यांनी परिस्थितीचे आकलन करुन घेऊन , निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी मुलांना मोबाईल , शरीर हेच मोठी धनसंपत्ती, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते, आकार देण्याचे काम शिक्षकाने कसे केले पाहिजे, त्याचबरोबर विदयार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदु मानून त्यास विविध शैक्षणिक क्षेत्रात कसे प्रारंगत करावे त्याचबरोबर त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन अनुभवाचे बोल उदाहरणासह विद्यार्थ्यांना पटवून मुलांची मने जिंकून मुलांना त्यांच्या जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याकरिता प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी ॲड दत्तात्रय रूपनवर यांनी आयुष्य हे सुख दुःखांच्या अनुभवाने भरलेलं पुस्तक त्या पुस्तकावरील सुंदर मुखपृष्ठ म्हणजे आई वडील त्याचसोबत संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते ती आई आणि आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करतात ते वडील यांचा आपल्या जीवनातील सिंहाचा वाटा या विषयावर त्यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी तं. मु.अ. दत्तात्रय बंडगर. डॉ. सतिश ज्ञानदेव रुपनवर, SRPF जवान चि. अक्षय बंडगर , सचिव दिपाली जवळगे,अतुल माने, अतिश चव्हाण, साजन शिंगाडे, गायकवाड, सारिका तीपाले, स्वाती जाधव, ऐश्वर्या कांबळे उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा माने प्रास्ताविक वर्षा कोळेकर तर आभार प्रदर्शन दिपाली चव्हाण यांनी केले व कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा