*आ. बबन दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबिर संपन्न*
*चांदज येथे चारशे लोकांची तपासणी ; ५४ रुग्णांचे निदान*
टेंभुर्णी (प्रतिनिधी) भारत जगताप :-
भाई भाई विद्यालय चांदज (ता.माढा) येथे आमदार बबनराव शिंदे यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान शिबिराचे उद्घाटन माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते कारखान्याचे संचालक पांडुरंग घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
शिबिराचे आयोजन माजी जिल्हा परिषद सदस्या अंजनीदेवी पाटील, शिवाजीराव पाटील यांच्या वतीने करण्यात आले.
या सर्वरोग निदान शिबिरामध्ये एकूण ४०० लोकांची तपासणी करण्यात आली. मधुमेह २० रुग्ण, उच्च रक्तदाब १४ रुग्ण व नेत्र रोगाचे २० रुग्ण आढळून आले. नेत्र तपासणीतील रुग्णांना मुद्रानी हॉस्पिटल येथे ऑपरेशन करण्यासाठी माहिती देण्यात आली.
विक्रमसिंह शिंदे म्हणाले सध्याच्या काळात हायब्रीड भेसळ युक्त अन्नधान्य असल्याने रोगराईस निमंत्रण मिळत आहे. लवकर व वेळेत निदान झाल्यास वेळेत उपचार होवून रुग्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे असे सर्व रोग निदान शिबिर मोठ्या संख्येने घेतले पाहिजेत.
वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक बागल, नेत्ररोग तज्ञ डॉ. प्रमोद बोडगे, डॉ. सुनील खराडे, डॉ. शिल्पा खराडे यांनी लोकांची तपासणी केली. तपासणीसाठी आरोग्य सेवक संजय चव्हाण, दयानंद झेंडे, नवनाथ मुळे, योगेश वळवे, आरोग्य सेविका मनीषा डोंगरे, नीता शिंदे, ज्योती यमपुरे यांनी मदत केली.
यावेळी उपसभापती धनाजी जवळगे, कारखान्याचे संचालक वेताळ जाधव, सचिन देशमुख, हिम्मत सोलंकर, राजाराम राजमाने, केशव देवकते, माजी सरपंच बळीराम हेगडकर, सोसायटीचे चेअरमन हनुमंत पाटील, उपसरपंच अनिल मचाले, दिलीप जाधव, राजाभाऊ लोंढे, यशवंत लठ्ठे, मगन यमपुरे, तात्यासाहेब रुपनवर सह ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालन गणेश कोकाटे यांनी तर आभार आप्पासाहेब पाटील यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा