पिलीव येथील महालक्ष्मी मंदिर परिसरातील आ रामभाऊ सातपुते यांच्या प्रयत्नातुन मंजूर असणाऱ्या कामाचे उदघाटन
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस -
माळशिरस तालुक्याचे आराध्य दैवत पिलीव येथील महालक्ष्मी मंदिर परीसर याठिकाणी भाविक भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणुन माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातुन यापुर्वी मंजूर असणाऱ्या भक्तनिवास व पुलाच्या कामाचा शुभारंभ नुकताच दहा तारखेला करणयात आला. महालक्ष्मी मंदीरालगत भक्तनिवास बांधकामासाठी तिरथक्षेत्र विकास आराखडयातुन भक्त निवास बांधकामासाठी ३६ लाख रुपये, पुरुषांच्या शौचालयासाठी १५ लाख रुपये, महिलांच्या शौचालयासाठी १५ लाख रुपये तर भक्त निवास परीसरात पेव्हर ब्लाक बसविणयासाठी ३० लाख रुपये तर महालक्ष्मी मंदीराकडे जाणाऱ्या रस्तावर पुलाचे बांधकाम यासाठी १ कोटी रुपयांचा निधी गेल्या सहा महीन् यापुर्वीच मंजूर करणयात आला होता .त्या कामाचे नुकताच भुमीपुजन व शुभारंभ करणयात आला. आमदार रामभाऊ सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातुन महालक्ष्मी परीसरातील कामासाठी तब्बल १ कोटी ९६ लाखाचा निधी मंजुर करणयात आला होता.यामुळे सोलापूर जिल्हासह आसपासच्या जिल्हयातुन तसेच बाहेरील राज्यातुन महालक्ष्मी देवीला येणाऱ्या भाविक भक्तांना चांगल्या सोयीसुविधा मिळणार आहेत.
माळशिरस तालुक्यातील सर्वात जुने व लाखो भावीकांचे श्रद्धांस्थान असणाऱ्या महालक्ष्मी मंदिराचा तिरथक्षेत्र विकास आराखडयात समावेश होऊन याठिकाणी भाविक भक्तांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होणे आवश्यक होते मात्र लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष न दिल्यामुळेच मंदीर परीसराचा गेल्या पन्नास वर्षापासून विकास व सुशोभिकरण झाले नाही. आमदार रामभाऊ सातपुते यांच्या रुपाने पहीला लोकप्रतिनिधी ज्यांनी भरपूर निधी उपलब्ध करुन दिला यामुळे भाविक भक्तांनमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.
फोटो - (१) महालक्ष्मी मंदिर परिसर भक्त निवासाचे उदघाटन करताना (२) पुलाच्या कामाचा शुभारंभ करताना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा