*व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिलीव यश*
पिलीव प्रतिनिधी( प्रमोद भैस )माळशिरस तालुक्यातील जि. प.प्रा.शाळा पिलीव येथील केंद्र स्तरावर सोलापूर जिल्हा परिषद आयोजित व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिलीवने घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत पिलीव केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता . यातील निबंध स्पर्धेत आरोही श्रीकांत सपाटे इयत्ता 4थी प्रथम क्रमांक, विघ्नेश विनोद तावरे इयत्ता 4थी द्वितीय क्रमांक,स्वरा महेश शिंदे इयत्ता 4थी तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.चित्रकला स्पर्धेत आयुध अमोल धर्माधिकारी याने द्वितीय क्रमांक पटकावला.समूह गीत गायन स्पर्धेत शाळेच्या (धोय धोय पाऊस पडतोय) या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.समूह नृत्य स्पर्धेत वारकरी नृत्य या संघाने प्रथम क्रमांक व कोळी नृत्य या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल पिलीव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.राजकुमार फासे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अमोल गांधी, उपाध्यक्षा सौ.प्रिया रजपूत, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,व सर्व पालकांनी अभिनंदन केले.या स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजयकुमार साळुंखे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती सावित्री करमाळकर मॅडम, सहशिक्षिका श्रीमती सुप्रिया पांगे मॅडम,सौ.मयुरा देशमुख मॅडम,सौ.महादेवी पाटील मॅडम व शाळेचे सर्व शिक्षकवृंद यांनी मार्गदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा