Breaking

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

युवा महाराष्ट्र फाउंडेशन, पुणे यांचा लघुउद्योजक सौ.प्राजक्ता जोशी यांना २०२४ चा महाराष्ट्र गौरव पुरस्कार...



युवा महाराष्ट्र फाउंडेशन, पुणे यांचा लघुउद्योजक सौ.प्राजक्ता जोशी यांना २०२४ चा महाराष्ट्र गौरव पुरस्कार...



कुर्डुवाडी, अरुण कोरे(प्रतिनिधी) कुर्डुवाडीच्या लघुउद्योजिका सौ.प्राजक्ता प्रफुल्ल जोशी यांना त्यांनी परिश्रमपूर्वक उभारलेल्या "श्री फ्रुडसची" लघुउद्योगातील महाराष्ट्र गौरव यशस्वी उद्योजिका म्हणून निवड करण्यात आलेबध्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
     कुर्डुवाडी सारख्या ग्रामीण भागात श्रीफ्रुड्सच्या संचालीका सौ.प्राजक्ता जोशी यांनी १९१८ साली घरगुती अल्पोपहार करुन पुरवठा करण्याचा घरगुती व्यवसाय सुरू केला होता.त्यांच्या हात गुणांची चव ग्राहकांना फारच आकर्षित करु लागल्याने मागणीत होणाऱ्या वाढीने त्यांना चांगलाच आत्मविश्वास वाढत गेला.
       आणि वर्षंभरातच कोरोनोच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वत्र व्यवसायाला बंदी आल्यावर सौ.जोशी यांनी कोरोनोचे नियमपालन करुन संधीचा फायदा उचलून अल्पदरात उत्कृष्ट पदार्थाचा पुरवठा सातत्याने सुरू ठेवला होता.
     अल्पोपहारा बरोबरच दिवाळीचे खमंग पदार्थ,जेवणाचे डबे,इन्स्टंट फूड मटेरियल आदी मागणीनुसार व्यवसायात वाढ करत गेल्या.गेल्या सात वर्षांत त्यांच्या उत्कृष्ट बनवण्याच्या खाशीयतीमुळे व्यवसायात चांगलीच वाढ झाल्यानें त्यांना त्यांचे पती प्रफुल्ल कुमार जोशी व मुलें स्वानंद,शुभंकर,शुभश्री यांनी मोलाचा हातभार लावला.अन् बघता बघता त्यांची मागणी माढा करमाळा तालुक्यासह पुण्यापर्यंत पोहचली.त्यांच्या मातोश्री सौ.अनिता कुलकर्णी यांचेही मोलाचे मार्गदर्शन वारंवार लाभल्याचे सौ.जोशी आवर्जून सांगतात.
      घरगुती मर्यादा येत चालल्याने व मागणीत सातत्याने वाढच होत राहील्याने त्यांनी दहा ते बारा नमुन्याचे विविधोपयोगी यंत्रे कुठल्याही बॅकेचे कर्ज न आढता स्वनिधितून खरेदी केल्या आहेत.त्यांनी अनेक महीलांनाही रोजगार मिळवून देण्यासाठी हातभार लावला आहे.
   सौ.प्राजक्ता कुलकर्णी यांनी जिद्द व चिकाटीने केलेल्या परिश्रमाची दखल पुण्याच्या युवा महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने त्यांना सन्मान पत्र, स्मृती चिन्ह,शाल श्रीफळ आदी देऊन गौरविण्यात आले आहे.त्या दसरा दिवाळीच्या कामात इतक्या व्यग्र आहेत की त्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नसल्याने संयोजकांनी पुरस्कार घरी येऊन प्रदान केला आहे.
      कोरोनोच्या दोन वर्षांच्या काळात कुर्डुवाडी शहर हादरलेलं असताना व कुर्डुवाडीच्या बे
कायदेशीर सौ.जोशींचे पती श्री.प्रफुल्लकुमार जोशी यांनी श्री.लॅबोरेटरीच्या माध्यमातून कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता अल्पदरात रुग्णसेवा केल्याने त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकाकडून प्रथम तपासण्याची अधिकृत परवानगी देऊन गौरविण्यात आलेले होते.
    एकंदरीत जोशी कुटुंबीयांचे सामाजिक योगदानाबद्दल सर्वाचे कौतुक केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा