जलसंपदा विभाग शाखा अभियंता शिवाजी तरंगे यांची विविध संघटनेच्या वतीने बदली करण्याची मागणी
* *यांच्यावर मेहरबान कालावधी पूर्ण होऊन ही बदली नाही त्यामुळे अधिकारी व नागरिकांचे नाराजी*
टेंभुर्णी (प्रतिनिधी ) जलसंपदा विभागाच्या हायड्रो विभागामध्ये कार्यरत असणारे शाखा क्रमांक तीन चे शिवाजीराव तरंगे यांच्या राजकीय संबंध आणि वर्चस्वाचे सध्या इंदापूर व भिमानगर उजनी धरण परिसरातील नागरिक व उजनी विभागाचे कर्मचारी यांच्यामध्ये जोरदार चर्चा असून शाखा अभियंता च्या हाताखाली अभियंता व उपाभियंतांना काम करावे लागत असल्याची चर्चा या परिसरात जोरदारपणे होत असून संबंधित शिवाजीराव तरंगे हे शाखा क्रमांक तीन चे अभियंता असताना शाखा अभियंत्याला विद्युत अभियांत्रिकी मध्ये मुख्य अभियंताचा चार्ज कोणत्या कारणाने दिला सदर ठिकाणी अनेक वर्ष काम करत असूनही त्यांची बदली का होत नाही जलसंपदा विभागाचे अधिकारी त्यांच्यावर इतके का मेहेरबान आहेत हे न उघडणारे कोडे असून त्यांच्या या राजकीय व अधिकार्यावरील वर्चस्वाचे आणि संबंधाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे अनेकांच्या तक्रारी असताना सुद्धा त्यांची या ठिकाणाहून बदली का होत नाही तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या अंडर खाली काम का करावे लागते याचेही पुढे अजून उलगडले कोंडे नाही तरी
याबाबतीत सविस्तर वृत्तांत असा की जलसंपदा विभागाच्या इंदापूर अधिपत्याखाली उजनी धरणावर अभियांत्रिकी विभागात भिमानगर येथे सदरचे शिवाजी तरंगे हे कार्यरत असून सदर विभागामध्ये वरिष्ठ अभियंता व उप अभियता कार्यरत असताना शाखा अभियंत्याला या विभागाचा चार्ज देऊन या दोन्ही या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या हाताखाली काम का करावे लागते हेही न उलगडणारे कोडे आहे ? सदरचे शिवाजीराव तरंगे यांची तातडीने या ठिकाणावरून बदली करून संबंधित विभागाचा चार्ज या विभागातील अभियंता व उपअभियंता यांना द्यावा अशी मागणी नागरिकातून व विविध संघटनेच्या वतीने होत आहे सदरच्या विभागीय कार्यालयामध्ये अभियंता तसेच वरिष्ठ अभियंता असताना पदाचा कार्यभार कोणत्या का कारणास्तव देण्यात आला हे अजून समजले नाही त्या ठिकाणी कार्यरत असणारे उपअभियंता यांच्याकडे अभियंता असताना देण्यात आला याचे प्रयोजन काय सदस्य का अभियंता यांना कोणत्याही प्रकारचा प्रशासकीय अनुभव नाही त्यांना उप अभियंता पदाचा कार्यभार अनुभव नसताना कसा दिला आहे की माझी ओळख मुख्य अभियंता साहेब व मंत्रालयापर्यंत असून सदर अभियंता पदाचा गैरवापर करून वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर सतत दबाव व दहशत निर्माण करत आहे
श्री तरंगे अभी शाखा अभियंता आहे एकाच मुख्यालय सहा वर्षापेक्षा जास्त पगार कार्यरत असल्याने तसेच अधिकारी वर्गावर दबाव निर्माण करत असल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात यावी अशी मागणी कर्मचारी व नागरिकांमधून तसेच माढा तालुक्यातील विविध संघटनेतून होत आहे आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा