आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रचार दौऱ्यास चौदा गावातून प्रचंड प्रतिसाद ....
रणजीतसिंह शिंदे यांना विक्रमी मताधिक्य देण्याची प्रत्येक ठिकाणी गावकऱ्यांची ग्वाही...
टेंभुर्णी प्रतिनिधी :-
येत्या 20 नोव्हेंबर२४ रोजी होणाऱ्या माढा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने माढा विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या माळशिरस तालुक्यातील 14 पैकी 11 गावातून आमदार बबनदादा शिंदे यांनी आयोजित केलेल्या प्रचार दौऱ्यास अतिशय उत्साहाने मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आमदार बबनदादा शिंदे यांनी खळवे, माळखांबी, विठ्ठलवाडी, वाफेगाव, वाघोली, लवंग, मिरे ,उंबरे(वे) कोंडारपट्टा, नेवरे व जांभूड या अकरा ठिकाणी प्रचारा निमित्त गावभेट दौरा आयोजित केला होता. प्रत्येक गावात आमदार बबन दादा शिंदे यांचे वाद्याच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीने भव्य स्वागत करण्यात येत होते. मौजे उंबरे(वे )येथे आमदार शिंदे यांची उघड्या जीपमधून भव्य मिरवणूक व मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
आमदार बबनदादा शिंदे यांनी मागील १५ वर्षात या चौदा गावांमध्ये दिलेला कोट्यावधी रुपये निधी व केलेल्या विकास कामांचाआढावा प्रत्येक ठिकाणी पदाधिकारी व गावकरी स्वखुशीने सांगत होते. या निवडणुकीत रणजीसिंह शिंदे हे अपक्ष उमेदवार असून त्यांना मोठ्या मताधिक्याने आम्ही विजय मिळवून देऊ अशी ग्वाही प्रत्येक ठिकाणी पदाधिकारी, नागरिक व युवक उत्साहाने देत होते.
या निवडणुकीमध्ये आमदार बबन दादा शिंदे व रणजीत शिंदे यांचे बद्दल विरोधक खोटे आरोप करून करून खोट्या अफवा पसरवत आहेत, तसेच अनेक लबाड्या करून खोटी आश्वासने देत आहेत, परंतु त्यांच्या अशा धूर्त चलाख कावेबाज बोलण्याला व भूल थापांना मतदारांनी बळी पडू नये व या चौदा गावातून मागील पंधरा वर्षापासून केलेल्या विकास कामाच्या सत्य परिस्थितीवर विश्वास ठेवून रणजितसिंह शिंदे यांना प्रचंड मतदान करावे असे आव्हान गावोगावी स्थानिक पदाधिकारी व वक्ते आपल्या भाषणातून करत आहेत.
या दौऱ्याप्रसंगी माढा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे माजी कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर मौलासो पठाण राहुल रेडे रावसाहेब सावंत हनुमंत चव्हाण राहुल खटके अमोल धोत्रे सुनील राजमाने नवनाथ पवार राहुल टिक बापू भोळे शहाजी कदम सुनील भोसले दिलीप मिसाळ सुदर्शन मिसाळ दत्तात्रय पताळे विष्णू चव्हाण शब्बीर मुलानी विक्रम लाटे सागर भोसले संजय कदम दादा लोकरे मोहन लोकरे यांचे सह गावोगावचे ग्रामपंचायत पदाधिकारी सहकारी संस्थांचे पदाधिकारी नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा