Breaking

रविवार, ३ नोव्हेंबर, २०२४

दीपावली पाडव्यानिमित्त हजारो कार्यकर्त्यांशी आमदार बबनदादा व रणजीत भैय्या यांच्याकडून शुभेच्छांची देवाण घेवाण ....*


*दीपावली पाडव्यानिमित्त हजारो कार्यकर्त्यांशी आमदार बबनदादा व रणजीत भैय्या यांच्याकडून शुभेच्छांची देवाण घेवाण ....*

 टेंभुर्णी  /प्रतिनिधी.             फोटो 

         रविवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दिवाळी सणानिमित्त आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे सुपुत्र रणजीत भैय्या शिंदे यांनी त्यांच्या निमगाव (टे. )येथील निवासस्थानी हजारो नागरिकांच्या बरोबर दिवाळी  शुभेच्छांची देवाणघेवाण केली.
            विशेष वृत्तांत असा की आमदार बबनदादा शिंदे प्रत्येक वर्षी आपल्या निमगाव टे. गावी दीपावली पाडव्याच्या दिवशी शुभेच्छा भेट कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. या परंपरेनुसार चालू वर्षी रविवारी,दोन नोव्हेंबर रोजी निमगाव टे.येथे दीपावली शुभेच्छांचा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे सर्वत्र पडघम वाजत आहेत व रणजीत भैय्या शिंदे हे माढा विधानसभा निवडणुक रिंगणात अपक्ष उमेदवार आहेत. त्या अनुषंगाने माढा विधानसभा मतदारसंघातील माढा पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावोगावचे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आमदार बबनदादा शिंदे व रणजीत भैय्या शिंदे यांना दिपवाली शुभेच्छा देत होते व स्वीकार करत होते . या आनंदी जल्लोष- माहोलात अनेक युवक तसेच नागरिक दादा आणि भैय्या यांचे बरोबर फोटो काढणे ,सेल्फी घेणे तसेच काही महत्त्वाचे संभाषण करून  आनंद व्यक्त करताना दिसत होते.

      या विशेष प्रोग्राम मध्ये माढा विधानसभा मतदारसंघातील 134 गावातील अनेक आजी माजी जिल्हा परिषद , पंचायत समिती पदाधिकारी, सदस्य, नगरपालिका व नगर परिषदेचे सदस्य, अधिकारी,वयोवृद्ध  कार्यकर्ते,  नागरिक,  गावोगावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य गावोगावचे अनेक प्रतिष्ठित मान्यवर, सर्वसामान्य नागरिक, सहकारी संस्थांचे पदाधिकारी शेतकरी, मजूर, कामगार सर्व जाती धर्मातील नागरिक तसेच सोलापूर जिल्ह्यातून आलेले अनेक  प्रतिष्ठित नागरिक  , वकील, प्राध्यापक ,बागायतदार, शिक्षक उद्योजक ,व्यापारी, जिल्ह्या,तालुका व मतदार संघातील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार यांचे सह इतरही  सर्व थरातील नागरिकांचा समावेश दिसून येत होता. 
         सकाळपासून ते सायंकाळपर्यंत भेटीसाठी नागरिकांची रीघ चालू होती. बबन दादा व रणजीत भैय्या प्रत्येकाची आपुलकीने भेट घेऊन व त्यांच्या ख्याली-खुशालीची  चौकशी करत होते ,तसेच  सर्वांच्या साठी दीपावली निमित्त फराळाचे आयोजन करण्यात आले होते , हजारो नागरिक फराळाचा आस्वाद घेत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा