विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या गळीतहंगामाचा शुभारंभ
२६ लाख मे.टन गळीताचे उद्दिष्ट-व्हा. चेअरमन वामनराव उबाळे
टेंभुर्णी : -विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.युनिट नं.१ पिंपळनेर येथील सन २०२४-२५ गळीत हंगामाचा २४ व्या.ऊस गाळप हंगामा शुभारंभ गुरूवारी सकाळी व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून संपन्न झाला.
तसेच युनिट नं.२ करकंब येथील ६ व्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ संचालक पोपट चव्हाण यांच्या शुभहस्ते कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.
या कार्यक्रमा दरम्यान संचालक लाला मोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुगंधाताई मोरे यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापुजा कारखाना कार्यस्थळावर पार पडली.या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे उपस्थित होते.
यावेळी बोलताना व्हा.चेअरमन वामनराव उबाळे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही कारखान्याची यशस्वी घौडदौड वेगाने सुरू आहे. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ या गळीत हंगामात युनिट नं.१ कडे १८ लाख ९२ हजार ९४९ मे.टन ऊसाचे गाळप होवून ११ टक्के साखर उता-याने १९ लाख २८ हजार ८५० क्विंटल साखर पोती उत्पादन झाले आहे.तसेच युनिट नं.२ कडे ६ लाख २५ हजार ८८८ मे.टन ऊसाचे गाळप होवून ११.१४ टक्के साखर उता-याने ६ लाख ६३ हजार ९०० क्विं.साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे.दोन्ही युनिट चे मिळून २५ लाख १८ हजार ८३७ मे.टन गाळप होवून २५ लाख ९२ हजार ७५० क्वि.साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे.
चालू २०२४-२५ हंगामासाठी ऑफ सिझनमधील कामे वेळेत पूर्ण होवून गाळपासाठी दोन्ही कारखाने सज्ज झालेले आहेत. युनिट नं.१ पिंपळनेर येथे २५ हजार हेक्टर ऊसाची नोंद झालेली आहे.युनिट नं.२ करकंब येथे ७ हजार ३०० हेक्टर ऊसाची नोंद झालेली आहे.या हंगामामध्ये युनिट नं.१ कडे २० लाख व युनिट नं.२ कडे ६ लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ठ संचालक मंडळाने निश्चित केले आहे.हंगाम २०२४-२५ मध्ये ऊस पुरवठा होण्यासाठी ऊस तोडणी वाहतूकीसाठी बैलगाडी,
ट्रक,ट्रॅक्टर व टायर बैलगाडीचे करार करण्यात आलेले असून प्रत्यक्ष यंत्रणा कामावर रुजू झालेली आहे.सन २०२४-२५ गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सभासद,ऊस पुरवठादार,ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार,अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी संचालक रमेश येवले-पाटील,शिवाजी डोके,लक्ष्मण खुपसे,लाला मोरे,सचिन देशमुख,पांडूरंग घाडगे,पोपट चव्हाण,सुरेश बागल,प्रतापराव नलवडे,अशोक मिस्कीन,शिवाजी पाटील,राहूल पुरवत,अजित देशमुख,जोतीराम मदने,समाधान नरसाळे,हरिनाना कानगुडे,मारूती कोरके,नवनाथ पवार,गजानन पाटील,रविंद्र नरसाळे,बंडूनाना लांडे, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, युनिट नं.२ चे जनरल मॅनेजर एस.आर.यादव,चिफ इंजिनिअर एस.एस.महामुनी,चिफ केमिस्ट बी.जे.साळुंखे,शेती अधिकारी आर.जे.पाटील सर्व जिप. व पं.स. सदस्य,मार्केट कमिटी सदस्य,आजी माजी पदाधिकारी,कार्यकर्ते,सभासद शेतकरी,ऊस पुरवठादार,कारखाना अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा