Breaking

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०२४

गणपती फार्मसी महाविद्यालयाची जेऊर मधील आनंद हॉस्पिटलला भेट.


गणपती फार्मसी महाविद्यालयाची जेऊर मधील आनंद हॉस्पिटलला भेट.


टेंभुर्णी (प्रतिनिधी): अकोले
खुर्द ता. माढा येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयातील डी. फार्मसी आणि बी . फार्मसी द्वितीय  वर्षातील  विद्यार्थ्यांनी जेऊर येथील अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या आनंद हॉस्पिटलला भेट दिली. हॉस्पिटल मध्ये विद्यार्थ्यांना विविध विभागाची तसेच उपकरणांची माहिती मिळाली, जसे की डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी, आय सी यु विभाग, हॉस्पिटल फार्मसी, शस्त्रक्रिया विभाग, डेंटल विभाग, ऑक्सीजन प्लांट ऑपरेशन थेटर, सिटीस्कॅन विभाग, एम आर आय विभाग, इत्यादी गोष्टी प्रत्यक्ष पहायला व समजून घ्यायला मिळाल्या. येथे मिळालेल्या माहितीमुळे ज्ञानात भर पडल्याची प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी दिली. डॉ.अतुल लूनावत यांनी विद्यार्थ्यांसी संवाद साधला. त्यांनी स्वतः चा व हॉस्पिटलचा आजपर्यंतचा प्रवास विशद केला जो मुलांना भविष्यात नक्कीच मार्गदर्शी राहील. रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबाबत व परवानगीबद्दल संस्थेचे सचिव डॉ. रवींद्र बेंदगुडे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ. रूपाली बेंदगुडे, प्रा . डॉ.प्रशांत मिसाळ,प्रा.नामदेव शिंदे, प्रा.कोमल साळुंखे,प्रा. रूपाली राऊत, प्रा.पूजा शिंदे, प्रा .श्रद्धा कडाव उपस्थित होते. प्रा. आशिष जाधव यांनी हॉस्पिटल व्हिजिटचे समन्वयक म्हणून कार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा