अकलूजमध्ये भाजपाच्या ५ शाखांचे उद्घाटन
आणखी ३० शाखा काढणार - राम सातपुते
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अकलूज मधून राम सातपुते यांना चांगले मतदान मिळाले. यापुर्वी कधीही मोहिते-पाटील विरोधकांना अकलूजमधून इतके चांगले मतदान मिळाले नव्हते. यामुळे भाजपाचा आत्मविश्वास दुणावला असून माजी आमदार राम सातपुते यांच्या हस्ते अकलूज शहरातील विविध ठिकाणी ५ शाखांचे उउदघाटन करण्यात आले.
डिसेंबर अखेर आणखी ३० शाखा काढुन अकलूज भाजपमय करणार असल्याचे राम सातपुते यावेळी म्हणाले.
शाखा उदघाटन प्रसंगी राम सातपुते म्हणाले, केंद्रात आणि आता महाराष्ट्रातही भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे अकलूज व परिसरातील नागरीकांनी खुलेपणाने भाजपाला साथ द्यावी. भाजपाला साथ म्हणजे विकासाला साथ. आज जरी मी आमदार नसलो तरी येथील पाणी, आरोग्य, वीज, रस्ते व इतर समस्या सोडवण्यासाठी मी राज्य सरकारमधुन निधी आणायला समर्थ आहे. कालची निवडणुक हारलो असलो तरी मी माझा आत्मविश्वास गमावलेला नाही. या भागातील १ लाख ८ हजार ५०० लोकांनी मला पसंती दिली आहे. त्यामुळे अगदी खंबिरपणे मी तालुक्याच्या विकासासाठी काम करणार आहे.
भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर म्हणाले,राम सातपुते तुम्हाला आमदार नसल्याचे दिसत असले तरी येत्या काही दिवसांतच हे चित्र बदलेल आणि राम सातपुते विधान परिषदेचे आमदार म्हणून तुमच्या सेवेत रुजु होतील. त्यामुळे येथील नागरीकांनी, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नाउमेद न होता आणखी ताकदीने कामाला लागून पक्षाची ध्येय धोरणे, कार्यक्रम नागरीकांपर्यंत पोहोचवावीत असे आवाहन बाळासाहेब सरगर यांनी केले आहे.
शाखा उदघटन प्रसंगी बाळासाहेब वावरे, आप्पासाहेब देशमुख, सुजयसिंह माने-पाटील, जयराज माने-पाटील, रंजन गिरमे, अॅड. बी. वाय. राऊत, आप्पासाहेब रूपनवर, संजय देशमुख, बाजीराव काटकर, धर्मा माने, सोपान नारनवर, सोनु पराडे, महादेव कावळे, दादा उराडे, राहुल मदने, शरद मदने, लक्ष्मण गोरड, संतोष अडगळे सर्व शाखांचे नुतन पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा