Breaking

शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान देऊन जिल्ह्याचे पालकमंत्री करावे,,,,,,,,,,, नरेंद्रसिंह ठाकुर


सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान देऊन जिल्ह्याचे पालकमंत्री करावे,,,,,,,,,,, नरेंद्रसिंह ठाकुर 




करमाळा प्रतिनिधी 
2024 विधानसभा निवडणुका पार पडल्या मंत्रिमंडळ विस्तार झाला परंतु सोलापूर जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळाले नाही यामुळे पालकमंत्री पद हे निश्चितच दुसऱ्या जिल्ह्यातील मंत्र्यांना दिले जाणार यात काही शंका नाही 
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्यातील नेते मंडळांनी नेहमीच वेळोवेळी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे विस्तारामध्ये सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रीपद देऊन झुकतमाप दिले आहे परंतु गेले काही वर्षापासून जिल्ह्याला सापत्नीक वागणूक मिळत आहे पर जिल्ह्यातील मंत्र्यांना स्थानिक मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघांमध्ये विकास कामे निधीबाबत पुरेसे वेळ मिळत नाही ज्याप्रमाणे जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधींना स्थानिक विषय स्थानिक विषयांची परिपूर्ण माहिती असते  इतर जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना पुरेसा वेळ तसेच त्या विषयाचे गांभीर्य यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळते विशेष निधी असो किंवा अनेक वर्षापासूनचे प्रलंबित प्रकल्प असो याचा पाठपुरावा करणे त्याची अंमलबजावणी करणे निधी मिळून देणे या गोष्टीला निश्चितच मर्यादा येतात तसेच जिल्ह्यातील मंत्र्यांचा प्रशासनाबरोबर संवाद असतो यामुळे कामना निश्चितच गती मिळते यावेळी पालकमंत्री निवडताना काही जिल्ह्यांना झुकते माप तर काही जिल्ह्यांना स्थान न दिल्यामुळे निश्चितच अन्याय झाला आहे यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळास्थान देऊन जिल्ह्याचे पालकमंत्री करावे अशी मागणी नरेंद्रसिंह ठाकुर जिल्हा सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा सोलापूर पश्चिम यांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा