Breaking

शनिवार, १८ जानेवारी, २०२५

महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे संजयमामा शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन . कुस्ती स्पर्धेसाठी 300 मल्लांनी घेतला सहभाग



महाराष्ट्र केसरी  निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे संजयमामा शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन .  


कुस्ती स्पर्धेसाठी 300 मल्लांनी घेतला सहभाग 

प्रतिनिधी 
 
सोलापूर शहर कुस्तीगीर संघ व सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार संजयमामा शिंदे व जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले ‌ .
       १७ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता टेंभुर्णी तालुका माढा येथे महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ टेंभुर्णी येथील कुर्डूवाडी रोडवर ब्रिजच्या नजीक करण्यात आला . प्रारंभी संजयमामा शिंदे यांच्या हस्ते गादी व माती आखाड्याचे पूजन करण्यात आले .  १७ व १८ रोजी निवड चाचणी होणार आहे .
             यावेळी महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर , खरेदी विक्री संघाचे चेअरमन तुकाराम उर्फ बंडूनाना ढवळे ,  जिल्हा परिषद माजी सभापती शिवाजीराव कांबळे , सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान अस्लम काझी ,  पैलवान नागनाथ खटके पाटील , कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ महाडिक  , वस्ताद आण्णासाहेब ढाणे , विठ्ठल ढवळे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागेश खटके , शिवविचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय खटके पाटील , धनंजय मोरे , दादा कोल्हे ,  योगेश बोंबाळे , उमेश इंगळे , सुधीर मिस्किन , भाऊसाहेब काळे , नितीन खटके , गोरख खटके , सचिन पवार , माऊली महाडिक , आण्णासाहेब पराडे , गौतम माने उपस्थित होते .
         या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेमध्ये  जिल्ह्यातील विविध गटातील सुमारे ३०० पैलवानांनी सहभाग नोंदवला .  एकुण दहा गटातून ६०  पैलवानांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड होणार आहे .सोलापूर शहर व सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघाची एकत्र निवड चाचणी होणार आहे . सोलापूर जिल्हा अ , सोलापूर जिल्हा ब , सोलापूर शहर असे तीन संघ निवडले जाणार आहेत .
      दहा वजन गटात ५७ किलो , ६१ किलो ,  ६५ किलो , ७० किलो , ७४ किलो, ७९ किलो , ८६ किलो , ९२ किलो , ९७ किलो , ८६ + ते १२५ किलो  ( महाराष्ट्र केसरी ) या गटातून निवड झालेले पैलवान अहिल्यानगर येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी वरिष्ठ अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहेत.
       सुत्रसंचलन धनाजी मदने यांनी केले .  पंच म्हणून दत्तात्रय माने , रोहिदास आमले , नितीश काबली , अंकुश आरकिले , सागर मारकड , निलेश मारणे, श्रावण चोरमले , चंद्रकांत मोहोळ , गणेश जाधव ,हनिफ पटेल यांनी काम पाहिले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा