विनयभंग व मारहाण प्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर
टेंभुर्णी : - करमाळा तालुक्यातील एका गावातील महिलेच्या विनयभंग व मारहाण प्रकरणातील आरोपीस बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,करमाळा तालुक्यातील एका गावात यातील आरोपी उदयसिंह श्रीमंत झोळ यांच्या विरोधात दि.१७ डिसेंबर २०२४ रोजी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने तिचा विनयभंग करून मारहाण केली असल्याची फिर्याद दाखल केली होती.याबाबत यामधील आरोपी याने बार्शी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवा यासाठी ०२ जानेवारी २०२५ ला ॲड.दिग्विजय पाटील यांच्या वतीने अर्ज दाखल केला होता.या गुन्ह्यात न्यायालयाने २५ हजार रुपयाच्या जातमुचालक्यावर जामीन अर्ज मंजुर केला आहे.आरोपीच्या वतीने ॲड.दिग्विजय पाटील व ॲड.अनिकेत गुंड यांनी काम पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा