51 कोटी ऊस बिल शेतक-यांच्या खात्यात जमा
विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे दोन्ही युनिटचे मिळून 10 लाख गाळप पूर्ण
1 ते 10 जानेवारी या दहा दिवसाचे ऊस बील जमा
मा.आ.बबनराव शिंदे, संस्थापक अध्यक्ष
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब कारखान्याचे 1 ते 10 जानेवारी अखेर प्रति टन 2800 प्रमाणे ऊस बिल शेतक-यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहीती संस्थापक अध्यक्ष मा.आ.बबनराव शिंदे यांनी दिली. असून आम्ही आश्वासन देत नाही तर करून दाखवतो आणि शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यावर पाठवल्यानंतर सांगतो यापुढे बोलताना म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं. 1 पिंपळनेर व युनिट नं. 2 करकंब येथील सन 2024-25 चा गाळप हंगाम सुरू आहे. या हंगामात युनिट नं. 1 कडे प्रतिदिन 14000 ते 14500 व युनिट नं. 2 कडे 4500 ते 5000 मे.टन गाळप होत आहे. युनिट नं. 1 येथे आजअखेर 7 लाख 46 हजार 900 मे.टन ऊस गाळप झाले आहे. युनिट नं. 2 येथे आजअखेर 2 लाख 53 हजार 622 मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. दोन्ही युनिटचे मिळून आजअखेर 10 लाख 522 मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. या गळीत हंगामामध्ये युनिट नं. 1 पिंपळनेर व युनिट नं. 2 करकंब कडे 1 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत गाळपास आलेल्या पाचव्या 10 दिवसाचे ऊसास प्रति टन 2800 प्रमाणे पेमेंट शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. दहा दिवसाला व वेळेत पेमेंट देणारा विठ्ठलराव शिंदे जिल्ह्यातील एकमेव कारखाना आहे. या ऊस बिलापोटी कारखान्याने 51 कोटी 73 लाख बँकेत जमा केले आहेत. या गाळप हंगामात आजअखेर कारखान्याने ऊस बिलापोटी 235 कोटी 33 लाख अदा केलेले आहेत. 15 डिसेंबर अखेर ऊस तोडणी वाहतूक बिले अदा करणेत आलेली असून उर्वरीत बिले अदा करणेची दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. आजअखेर कारखान्याचे सभासद,बिगर सभासद व ऊस पुरवठादार यांनी सर्व हंगाम यशस्वी करणेसाठी सहकार्य केले असून सन 2024-25 हंगाम यशस्वी करणेसाठी सभासद,बिगर सभासद व ऊस पुरवठादार यांनी त्यांचा सर्व ऊस कारखान्यास पुरवठा करून हंगाम यशस्वी करणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष मा.आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर व इतर अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा