Breaking

सोमवार, २७ जानेवारी, २०२५

आढेगाव येथे शाळकरी मुलाने गोळी झाडून केली आत्महत्या



आढेगाव येथे शाळकरी मुलाने गोळी झाडून केली आत्महत्या




टेंभुर्णी (प्रतिनिधी):- आढेगाव तालुका माढा येथे एक धक्कादायक घटना घटना घडून आली. अवघ्या 14 वर्षाच्या शाळकरी मुलाने रिव्हॉल्वर मधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येच कारण समजू शकले नाही. ही दुर्दैवी घटना माढा तालुक्यातील आढेगाव येथे आज दुपारी 27 जानेवारी रोजी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. श्रीधर गणेश नष्टे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

आढेगांव येथील गणेश सदाशिव नष्टे हे सशस्त्र सीमा बल राजस्थान सेंटर येथे नोकरीस आहेत. आढेगांव येथे त्यांचे वडील सदाशिव नष्टे, पत्नी सारिका, श्रीधर व श्रेयश ही दोन मुले राहतात. गणेश नष्टे यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर असून ते जेव्हा गावाकडे येतात तेव्हा रिव्हॉल्व्हर त्यांच्याकडे असते. आज दुपारी साडेबारा वाजण्यापूर्वी घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये त्यांचा मुलगा श्रीधर गणेश नष्टे याने वडीलांच्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. श्रीधर नष्टे याने आत्महत्या कोणत्या कारणास्तव केली हे समजू शकले नाही. या या घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास पोसई सुरवसे करीत आहेत. अशा प्रकारची माहिती आडेगाव येथील तानाजी हिराजी जवळके यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशन दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा