Breaking

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

संत रविदास महाराज यांच्या 648 व्या जयंती निम्मित तुळजापूर येथे विविध कार्यक्रम संपन्न...


संत रविदास महाराज यांच्या 648 व्या जयंती निम्मित  तुळजापूर येथे विविध कार्यक्रम संपन्न...


तुळजापूर/प्रतिनिधी 

संत रविदास महाराज यांच्या जयंती निम्मित राष्ट्रीय चर्मकार महासंघा च्या जिल्हाध्यक्षा सौ प्रज्ञाताई गायकवाड यांच्या वतीने तुळजापूर येथे तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री.दिलीप शितोळे,श्री सागर कदम,सौ सुनीता मधुकर कांबळे,अनिता कदम,रुपाली कांबळे, कु रोहित बगल यांचा उपस्थित मान्य वरांच्या पुरस्कार देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. तसेच तालुक्यातील महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन घरउपयोगी भेट वस्तू वाटप केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  श्री अमोल तकभाते ( गटविकास अधिकारी) यांनी भूषविले..
तर दीप प्रज्वलन श्री गोकुळ तात्या शिंदे ,सौ.संगीता ताई कदम ,श्री नितीन शेरखाने,लालासाहेब मगर, सुरेश आप्पा भिसे,संजय नाना शितोळे यांनी केले.तर कार्यक्रमास मार्गदर्शन श्री प्रा जोगदंड सर यांनी केले
यावेळी गोरख भाऊ,दत्ता भाऊ कांबळे पारधे,यशपाल शिरसाट ,सुशांत रोकडे,उमेश सिध्दगणेश, रत्नशील थोरात ,तानाजी जाधव,जयाजी सोनवणे,राम सिध्दगणेश ,सौ मीनाताई शेरखाने ,उषाताई हब्बु,सरिता बनसोडे आदी मान्यवर व पुरस्कारार्थी व बंधू भगिनी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा