Breaking

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

प्रियांका पाटील एमपीएससी मधून अन्न सुरक्षा अधिकारी **मुलगी अधिकारी झालेली पाहण्याचे वडिलांचे स्वप्न अधुरे



**प्रियांका पाटील एमपीएससी मधून अन्न सुरक्षा अधिकारी 
**मुलगी अधिकारी झालेली पाहण्याचे वडिलांचे स्वप्न अधुरे 


टेंभुर्णी : - लहानपणीच आईचे छत्र हरपले,वडिलांनी आईचे दुःख जाणवू न देता सांभाळ केला.मुलीला उच्च शिक्षण घेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न दाखवले.मुलीने वडिलांचे स्वप्न जिद्दीने अभ्यास करून पूर्ण करीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत अन्न सुरक्षा अधिकारी वर्ग-२ या पदाला गवसणी घातली.

मात्र निकालाच्या अवघ्या चार दिवसांपूर्वी वडिलांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला.ही मन अतिशय सुन्न करणारी कहाणी आहे माढा तालुक्यातील अकोले-खुर्द ची कन्या प्रियांका प्रताप पाटील हिची.
अकोले-खुर्द येथील प्रताप शामराव पाटील यांचे नुकतेच निधन झाले.ते दोन मुली व एक मुलगा असे एकमेकांना आधार देत दिवस कंठीत होते.मुलांची आई तर लहानपणीच गेली होती.यामुळे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने प्रियांकासह दोन्ही बहिणी व भाऊ अशी तिन्ही भावंड आई-वडिलांच्या आशीर्वादास कायमची पोरकी झाली.अशात एकीकडे वडिलांचे दुःख तर दुसरीकडे निवड झाल्याच्या आनंदाचा क्षण अशी स्थिती माढा तालुक्यातील अकोले खुर्द येथील पाटील कुटुंबात पाहायला मिळाली आहे.प्रियांकाला अधिकारी म्हणून पाहण्याचे वडील प्रताप पाटील यांचे स्वप्न होते.अखेर ते स्वप्नच राहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा