विठ्ठलवाडी चे विठ्ठल गुंड यांचे निधन
माढा /प्रतिनिधी- विठ्ठलवाडी ता.माढा येथील रहिवासी व सध्या पुणे येथील शाहू मंदिर कॉलेजमध्ये कार्यरत विठ्ठल मगन गुंड (वय-57) यांचे बुधवारी 5 फेब्रुवारी रोजी पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात,आई,वडील,दोन चुलते,पत्नी,एक भाऊ,दोन बहिणी,दोन मुले,एक मुलगी, सुन व नातवंडे असा परिवार आहे.ते विठ्ठलवाडीचे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड व माजी ग्रामपंचायत सदस्य भिमराव गुंड यांचे पुतणे,पुणे येथील जॉन डिअर कंपनीत कार्यरत इंजिनियर विनोद गुंड यांचे वडील,माध्यमिक शिक्षक नारायण गुंड यांचे बंधू , प्रा.छगन गुंड,प्रा.कुंडलिक गुंड, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, प्राथमिक शिक्षक गणेश गुंड, विठ्ठलराव शिंदे प्राथमिक पतसंस्थेचे संचालक सुधीर गुंड व प्राथमिक शिक्षक दिनेश गुंड यांचे चुलत भाऊ होत.त्यांच्या अकाली निधनाने विठ्ठलवाडी गावात शोककळा पसरली असून सर्वजण हळहळ व्यक्त करीत आहेत.समस्त गुंड परिवार,मित्रमंडळी व नातेवाईक यांच्यावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्यावर विठ्ठलवाडी येथील स्मशानभूमीत गुरुवारी 6 फेब्रुवारी रोजी सकाळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा