Breaking

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५

टेंभुर्णी येथे नऊ वर्षाच्या मुलाचा शेत तळ्यात बुडून मृत्यू


टेंभुर्णी येथे नऊ वर्षाच्या मुलाचा शेत तळ्यात बुडून मृत्यू 

 माढा (तालुका प्रतिनिधी ):- टेंभुर्णी येथील कुर्डूवाडी रोड एमआयडीसी चौक येथे नऊ वर्ष मुलाचा शेततळ्यावर चालताना पाय घसरून पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला असल्याची घटना बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कुर्डूवाडी रोड, एमआयडीसी चौक, टेंभुर्णी तालुका माढा येथे घडली आहे. 
याबाबत हकीगत अशी की बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7 वा. ते 7:45 वा. दरम्यान सतीश गोरख व्होटकर यांचा मुलगा वेदांत सतिश व्होटकर वय 09 वर्षे रा. कुडूवाडी रोड, एम आय डी सी चौक, टेंभूर्णी, ता. माढा हा मौजे टेंभूर्णी गावचे शिवारातील एमआयडीसी लगत आनंता कुटे यांचे शेत तळ्यावर चालत असताना पाय घसरून तळ्यातील पाण्यात पडून बुडून मयत झाला आहे. अशी माहिती टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मयत वेदांतचे वडील सतीश गोरख व्होटकर वय 40 यांनी दिली आहे. सदर घटनेचा तपास पोहेकॉ लांडगे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा