Breaking

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५

खरा देव माणसातच आहे - हभप शिरीष महाराज डोंगरे .


खरा देव माणसातच आहे - हभप शिरीष महाराज डोंगरे . 

कन्हेरगांव दि प्रतिनिधी

क्षणो क्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू
नाशिवंत देह जाणार सकल 
आयुष्या खातो काळ सावधान.
संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची
तुका म्हणे इह लोकीचे  व्यवहारे नका डोळे धुरे भरुनी राहो. या अभंगाचे विवेचन करताना पांडुरंग म्हणजे पा म्हणजे पाहणारा.. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे कर्म पाहणारा..डु म्हणजे तो कधी न डुबणारा , र म्हणजे रंग रुपाहुणिही वेगळा..ग म्हणजे पुर्ण गगणात भरुन उरलेला म्हणजे पांडुरंग. मनुष्य जन्म हा सर्वात शेवटचा आहे. त्याची कदर करा , पुन्हा मागून सुद्धा मिळणार नाही . व्यसनापासून दूर राहा . खरे देव हे आपले आई आणि वडीलच आहेत ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं , त्यामुळे आई वडील सासू-सासरे यांची जन्मभर सेवा करा .खरा देव माणसातच आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय किर्तनकार हभप शिरीष महाराज डोंगरे यांनी केले आहे .
            महाशिवरात्रीनिमित्त कन्हेरगांव तालुका माढा येथील काशीद वस्ती येथील महादेव मंदिरात आयोजित किर्तन सेवेत ते बोलत होते. यावेळी महिला भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .
           यावेळी हभप विष्णू महाराज डोके पाटील ,  नागनाथ काशीद , धनंजय मोरे , हनुमंत काशीद , जयराम डोके, लिंबराज हांडे , हरिदास सरडे , सदाशिव कदम , दत्तात्रय भरगंडे, अरुण सरडे , भागवत काशीद , आजिनाथ कदम , हंबीरराव कदम , दत्तात्रय गोंदिल, अशोक काशीद, तुकाराम काशीद, लक्ष्मण डोके , विनायक पाटील , दिपक भरगंडे , सोमनाथ कदम , पद्माकर काशीद , सचिन भरगंडे , उत्तम भरगंडे , मोहन भरगंडे, नवनाथ कदम , बाळासाहेब काशीद , रेवण काशीद , सुरेश पाटील , रामचंद्र खोचरे , जालिंदर डोके , हनुमंत डोके,महादेव डोके , शिवदास पाटील , साहेबराव माने , तुकाराम मोरे , सौदागर भरगंडे , नाना डोके , अंकुश मोरे , मृदुंगाचार्य ओम महाराज भातलंबडे  , विठ्ठल पाटील, संतोष ताटे , आबा धुमाळ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा