Breaking

रविवार, १६ मार्च, २०२५

लाडक्या बहिणीचे मिळालेल्या पैशावरून घरातच ‘लाडक्या बहिणी’वर शस्त्राने हल्ला*, *पतीसह सासूविरुध्द गुन्हा दाखल....!*


*लाडक्या बहिणीचे मिळालेल्या पैशावरून घरातच ‘लाडक्या बहिणी’वर शस्त्राने  हल्ला*, 
*पतीसह सासूविरुध्द गुन्हा दाखल....!*



 *जखमी लाडकी बहीण निशा धनाजी लोंढे*
 *(वय २८) हिने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या पतीसह सासूविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे*.



कुर्डूवाडी/ प्रतिनिधी
*महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापोटी मिळालेल्या पैशावर घरात पतीराजाचा अधिकार राहात असून त्यातून परस्पर खर्च केल्याबद्दल विचारणा करण्याची सोयही लाडक्या बहिणींना राहिली नसल्याचे प्रकार घडत आहेत*. 

*माढा तालुक्यातील लोणी गावात लाडक्या बहिणीच्या पैशांवरून एका लाभार्थी विवाहितेवर पती व सासूने मिळून सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली*.
यासंदर्भात जखमी लाडकी बहीण निशा धनाजी लोंढे
 (वय २८) हिने कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या पतीसह सासूविरुध्द गुन्हा दाखल केल्याने माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे
निशा हिच्यावर कोयता आणि लाकडाने हल्ला झाला आहे.तिच्यावर कुर्डूवाडी येथील खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
*निशा लोंढे* हिला *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण* योजनेचा लाभ मिळतो. गेल्या फेब्रुवारी २०२५  व चालू मार्च २०२५ महिन्याचे हक्काचे पैसे मिळाले खरे; 
परंतु हे सर्व पैसे पतीने घेऊन परस्पर खर्चही करून टाकले.त्यामुळे नाराज झालेल्या *निशा* हिने पतीला विचारणा केली. त्यावरून भांडण झाले.
यात सासूने मुलांची बाजू घेऊन सून 
निशा हिला शिवीगाळ करून धमकावले.
त्याचवेळी पतीने लाकडी दांडक्याने राहत्या घरी पत्नीच्या पाठीवर आणि मांडीवर मारहाण केली.
 नंतर हातात कोयता घेऊन तिच्या पायावर, गुडघे आणि हातावर हल्ला केला.
 या गुन्ह्याची नोंद कुर्डूवाडी पोलीस स्टेशनला झाली असली तरीही पती व सासूला अद्याप अटक झाली नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा