Breaking

गुरुवार, ६ मार्च, २०२५

विश्वगुरु तुकाराम महाराज यांच्या बीजे निमित्त कुर्डू येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन "



" विश्वगुरु तुकाराम महाराज यांच्या बीजे निमित्त कुर्डू येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन "



कुर्डू : - (बाळकृष्ण कापरे) समर्थ सद्गुरु नरसिंहेश्वर महाराज यांचे स्मरणार्थ,  समर्थ सद्गुरु रामकृष्ण महाराज यल्लटी संस्थान,  परमपूज्य रामानंद सरस्वती महाराज चिंचगाव (टे),  यांच्या कृपाशीर्वादाने, समर्थ सद्गुरू परमपूज्य बालयोगी तपस्वी सुखदेव महाराज बार्डी,  परमपूज्य कल्याण महाराज कुलकर्णी यांच्या आशीर्वादाने,  व कुर्डू  ग्रामस्थांच्या सहकार्याने माढा तालुक्यातील कुर्डू येथील श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था येथे विश्वगुरू जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीजे निमित्त रविवार दिनांक 9 मार्च रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
        यामध्ये कलश पूजन,ग्रंथ पूजन, विना पूजन,प्रतिमा पूजन, व्यासपीठ पूजन, दीप प्रज्वलन, मंडप उद्घाटन आदि विविध कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते होणार असून काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन,  सामुदायिक भजन, ज्ञानेश्वर हरिपाठ, इंचगिरी संप्रदायातील बारा अभंग, हरी किर्तन व हरि जागर आदी कार्यक्रम होणार आहेत.
         या सप्ताहामध्ये ह.भ.प.उत्तम महाराज बडे आळंदी, ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे परांडा, ह.भ.प. सपनाताई महाराज साखरे आळंदी, ह.भ.प. राम महाराज अभंग वडापुरी, ह.भ.प. कैलास महाराज केंजळे धर्मपुरी, ह.भ.प. काशिनाथ महाराज माने फुलकळस परभणी, ह. भ.प.अमोल महाराज सूळ मोरोची, यांची विनोदी व सांप्रदायिक कीर्तन सेवा होणार आहे. किर्तन सेवेनंतर भजनाचा कार्यक्रम होणार असून अखंड आठ दिवस ज्ञानदानाचे कार्य होणार आहे. तसेच रविवार दिनांक 16 मार्च रोजी समर्थ सद्गुरु तुकाराम बीजे निमित्त ह.भ.प.दिपक महाराज शिंदे यांची कीर्तन सेवा होणार असून तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी होईल सायंकाळी आठ वाजता ह.भ.प. पिंटू महाराज घाडगे तुळजापूर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.तसेच आठ दिवस विविध भाविक भक्तांकडून अन्नदानाची सेवा होणार आहे.
      यासाठी कुर्डू व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहातील सेवेचा तन मन धनाने श्रवण सुखाचा लाभ घ्यावा अशी विनंती सप्ताह संयोजक ह.भ.प. हसन महाराज आतार ,  माननीय रामहरी हांडे चेअरमन व भारत मामा ढाणे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा