न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज व आर्या पब्लिक स्कूल टाकळी (टे) येथे जागतिक महिला दिन निमित्त प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन
टेंभूर्णी/ प्रतिनिधी
आज ०८ मार्च २०२५, जागतिक महिला दिन त्या निमित्ताने आर्या पब्लिक स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल माध्यामिक विभाग व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ.सौ. देवकते मॅडम, डॉ. सौ. पाटील मॅडम, उपसरपंच सौ. स्वाती गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या सौ. माधुरी माने, सौ. सोनाली घाडगे उपस्थित होत्या. सर्व मान्यवर महिलांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात झाली. प्रशालेच्या विदयार्थीनींनी भाषणे, कविता, नृत्य, गायन या माध्यमातून स्त्री शक्तीचे महत्व स्पष्ट केले.
प्रशालेची माजी विद्यार्थीनी कु. पूजा पोपट जाधव हिची मुंबई शहर पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल तिचा यथोचित सन्मान प्रशालेतर्फे सौ. कुबेर मॅडम यांनी करून तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सत्कारास उत्तर देताना पूजा जाधव हिने शिक्षकांप्रती, शाळेप्रती आपल्या भावना ऋण व्यक्त केले.
तसेच आर्या पब्लिक स्कूलच्या गेळे मॅडम यांची आलेगांव (बु) येथे अंगणवाडी शिक्षिका म्हणून निवड झाल्याबद्दल सौ. देवकते मॅडम यांच्या हस्ते त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
इयत्ता सातवी ते अकरावी च्या विद्यार्थीनींना डॉ. देवकते मॅडम व डॉ. पाटील मॅडम यांनी आरोग्यविषयी व्याखान दिले, संवादरूपी कार्यक्रमातून मुलींना योग्य मार्गदर्शन केले.
इयत्ता आठवीच्या मुलींनी सूत्रसंचलन, प्रास्ताविक, आभार असे सर्व कार्यक्रमाचे नियोजन पार पाडले. त्यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक इतर कर्मचारी या सर्वांनी महिलादिनानिमित्त शुभेच्छा दिल्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा