पांचगणी सायबर पोलिसांनी ४ जणांना मिळवून दिली ऑनलाईन फसवणुकीची रक्कम
पांचगणी aj24taas न्यूज नेटवर्क
पांचगणी : पांचगणी पोलीस ठाणे सायबर व गुन्हेप्रकटीकरण शाखेने सायबर लुटारुंच्या फसवणुकीचे बळी ठरलेल्या चार जणांना त्यांच्या फसवणुकीची रक्कम परत मिळवून दिली आहे. याबाबत पांचगणी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पांचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रहीवासी व पर्यटकांचे ऑनलाईनद्वारे अमिष दाखवुन फसवणुक होणेचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर व वाई उपविभागिय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम या वरीष्ठांचे आदेशाने ऑनलाईन फसवणुक झालेली रक्कम शोध घेणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. या आदेशान्वये सायबर तसेच गुन्हे प्रकटीकरण पथक पोलीस अंमलदार यांनी पांचगणी पोलीस ठाण्यात ऑनलाईन फसवणुक झालेली रक्कमेचा तपास हाती घेतला होता.
पांचगणी पोलीस ठाणेत दाखल झालेल्या ऑनलाईन फसवणुक झालेल्या चार अर्जांची बुद्धी कौशल्याने व तांत्रिक माहीतीच्या आधारे पोलीस ठाणे हद्दीतील परीसर व आजुबाजुचे पोलीस ठाणे हद्दीतुन तसेच इतर जिल्ह्यातून शोध घेवुन एकुण ३,७०,०००/- रुपये मिळवण्यात या पथकाला यश आले. ऑनलाईन फसवणुक झालेली रकमेचा शोध घेवुन ऑनलाईन फसवणुक झालेली रक्कम प्राप्त करण्यास सायबर तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकास यश प्राप्त झाले असुन नमुद ऑनलाईन फसवणुक झालेली रक्कम नागरीकांना परत करणेत आली आहे.
पांचगणी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली सायबर तसेच गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार पोलीस नाईक तानाजी शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश लोखंडे व पोलीस कॉन्स्टेबल अमोल धर्मु जगताप यांनी या शोध मोहिमेत सहभाग घेतला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा