*स्वप्नील पाटील यांचा पुढाकाराने पोलिसांनी उभारलेल्या बालोद्यानचे लोकार्पण उद्घाटन सोहळा संपन्न*
*सहायक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर व राजकीय मंडळीं यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न*
माढा/प्रतिनिधी
माढा, ता. १ : माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुकचे सुपूत्र
केंद्रीय ग्रामविकास मंत्री यांचे खाजगी सचिव (IRS) मा. स्वप्निल पाटील अधिकारी स्वप्नील पाटील यांच्या प्रयत्नातून व
माढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर यांच्या संकल्पनेतून कंपनीच्या सी एस आर फंडातून माढा शहरातील तहसील कार्यालयासमोर असलेल्या मैदानावर उभारण्यात आलेल्या बालोद्यानचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी नगराध्यक्षा अॅड.मीनल साठे, प्रगतशील बागायतदार शरद पाटील व वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला .
माढा तहसील कार्यालयासमोर माढा पोलीस स्टेशनचे परेड मैदान असून, त्या मैदानाचा वापर फक्त स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनादिवशीच होत असायचा. त्यामुळे इतरवेळी त्या मैदानावर काटेरी झाडेझुडपे, गवत वाढलेले असायचं. परंतु माढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर यांनी या मैदानाची सुशोभीकरणाचे काम हाती घेत. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून मैदान स्वच्छ करून घेत. त्याठिकाणी ऑक्सिजन पार्क व्हावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची झाडे लावून, ड्रीपद्वारे पाण्याची सोय केली.
त्याचे लोकार्पण सोमवारी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माढा पोलिसांनी कर्तव्य बजावत असताना एक सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी
लहान मुलांसाठी व महिलांसाठी केलेल्या सामाजिक कार्याचे तसेच स्वप्नील पाटील यांनी देखील निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.
या कार्यक्रमासाठी सहायक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर, साहेब साह्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास मारकड साहेब पो. हवालदार साळुंके,सर्व महिलां होम गार्ड,अजिनाथ माळी, दिनेश जगदाळे, वेदांत साठे, शिवाजी जगदाळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा