बेलोशी शाळेचा शताब्दी महोत्सव १० एप्रिलला होणार ; कार्यक्रमास उपस्थित रहावे : शताब्दी महोत्सव कमिटीच्या वतीने प्रकाश बेलोशे यांचे आवाहन
पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : बेलोशी (ता. जावली) येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नियोजन समितीचे वतीने प्रकाश बेलोशे सर यांनी दिली आहे.
शंभर वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या केंद्र शाळेत बेलोशी ,काटवली, शिंदेवाडी, रूईघर, दापवडी व महू अशा सहा गावातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून गुरूवार दि.१० एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून शाळेत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शताब्दी महोत्सवाच्या या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर, जिल्हा शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, श्रीमती शबनम मुजावर, जावली तालुका गटविकास अधिकारी डॉ, निलेश पाटील, शिक्षण योजनाधिकारी जि.प.सातारा. अनिश नायकवडी, गटशिक्षणाधिकारी सुधिर धुमाळ , चंद्रकांत कर्णे , जगन्नाथ शिंदे, शंकर बिरामणे तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
या सोहळ्यास शाळेचे माजी मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित रहाणार असून त्यांचा उचित गौरव या शताब्दी महोत्सव कमिटीच्या वतीने करण्यात येणार आहे. बेलोशी शाळेच्या भव्य प्रांगणात मंडप, व्यासपीठ उभारण्याची लगबग चालू झाली असून एक दिवसभराच्या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमानिमित काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या सर्व कार्यक्रमास माजी शिक्षक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शताब्दी महोत्सव समिती, ग्रामविकास मंडळ मुंबई, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत बेलोशी व भागातील
तरूण वर्ग यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा