Breaking

रविवार, ६ एप्रिल, २०२५

पाचगणीत भव्य शोभा यात्रा ; श्रीराम चौकात श्रीराम जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन


पाचगणीत भव्य शोभा यात्रा ; श्रीराम चौकात श्रीराम जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन 

पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी  : दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव सोहळा श्रीराम चौकात उत्साहात वाजतगाजत पार पडला. प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भाविकांनीही दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.  
पाचगणीच्या श्रीराम चौकात आज सकाळपासूनच रामनवमीची लगबग चालू होती. श्रीराम चौक भगव्या पताका, भगव्या मंडपाने भगवेमय झाला होता. सकाळी संपूर्ण बाजारपेठेतून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये सर्व भाविक भक्त सहभागी झाले होते. ढोलांचा छबीना या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले होते. 
त्यानंतर पाचगणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बापूसाहेब बिरामणे, शेखर भिलारे, मेहुल पुरोहित, डॉ. शीतल चोपडे, जी के अमराळे,  अंकुश आबा मालुसरे, यशवंत पार्टे , सचिन वाडकर, सुभाष मोरे, गौरव कासुर्डे, श्री बिरामने सर, आनंद मगर,  तसेच श्रीराम उत्सव कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
दिवसभर श्रीराम दर्शनासाठी श्रीराम चौकात भाविकांनी गर्दी केली होती. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 
पाचगणी : श्रीराम  प्रतिमेचे पूजन करताना दिलीप पवार शेजारी बापू बिरामणे व इतर ( रविकांत बेलोशे छाया चित्र सेवा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा