प्रहार जनशक्ती पक्षाचा संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा व विभागीय मेळावा 12 मे रोजी सोलापुरात
टेंभुर्णी/ प्रतिनिधी
प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांक्रांती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर लातूर धाराशिव या तिन्ही जिल्ह्याचा संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा व कार्यकर्ता मेळावा 12 मे रोजी सोलापूर येथे निर्मिती लॉन विजापूर रोड या ठिकाणी होणार आहे.
या मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाच्या कार्यात अमूल्य योगदान देणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्याचा सन्मान करण्यात येणार आहे. सोलापूर विभागातील लातूर धाराशिव सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातून या मेळाव्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष तसेच प्रहार दिव्यांक्रांती संस्था यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असून,प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा मंत्री बच्चुभाऊ कडू या विराट अशा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या संताजी धनाजी महाराष्ट्र प्रदेश मोहिमेचे प्रमुख पक्ष निरीक्षक श्री महेश बडे सर व मंगेश ठाकरे साहेब सोलापूर विभागाचे पक्ष निरीक्षक हे उपस्थित राहणार आसुन या दोघांच्या मार्गदर्शनात मार्गदर्शनात हा कार्यक्रम मोठ्या ताकतीने करू असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी सांगितले.
भविष्यातील पक्षाची ध्येय धोरणे आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच येणाऱ्या कर्जमाफी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील या विभागीय मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून या मेळाव्यात शेतकरी कर्जमाफी साठी 2 जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील घरापासून ते नागपूर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापर्यंत होणाऱ्या शेतकरी आत्मसन्मान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे.
त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यातून प्रहार चे कार्यकर्ते त्याचबरोबर शेतकरी,युवक, दिव्यांग बांधव ,विधवा महिला भगिनी यांना या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून या मेळाव्याला हजारोंच्या संख्येत लोक उपस्थित राहतील अशी माहिती जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा