Breaking

बुधवार, १४ मे, २०२५

करमाळा येथील असीम बागवान याचे दहावीच्या CBSE BOARD परीक्षेत घवघवीत यश


करमाळा येथील असीम बागवान याचे दहावीच्या CBSE BOARD परीक्षेत घवघवीत यश 

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा शहरातील डॉक्टर सादिक बागवान यांचे चिरंजीव असीम बागवान याने नुकत्याच संपन्न झालेल्या शालांत अर्थात दहावीच्या परीक्षेत (सीबीएसई बोर्ड ) उज्वल यश संपादन केले आहे.त्याला एकूण 98.6 % टक्के मार्क मिळाले आहे
असीम बागवान हा लातूर येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये आपले शिक्षण घेत होता त्याने अथक परिश्रम घेत सदरचे घवघवीत व उज्वल यश मिळवले आहे त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.
करमाळा शहरातील प्रसिद्ध डॉक्टर सादिक बागवान यांचा तो चिरंजीव असून भविष्यात आपणास डॉक्टर होण्याचे त्याने बोलताना सांगितले त्याच्या या यशाबद्दल करमाळा अर्बन बँकेचे माजी संचालक तसेच करमाळा उपजिल्हा रुग्णालय समितीचे सदस्य माजी नगरसेवक फारुख भाई जमादार तसेच सकल मुस्लिम समाज चे अध्यक्ष जमीर भाई शेख व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम चे संस्थापक अध्यक्ष समीर शेख यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा