Breaking

बुधवार, १४ मे, २०२५

कोर्टाच्या आदेशालाही केराची टोपली!करमाळा तहसील व सालसे मंडलअधिकारी यांच्या हलगर्जीमुळे सैन्य परिवाराची फरफट



कोर्टाच्या आदेशालाही केराची टोपली!
करमाळा तहसील व सालसे मंडलअधिकारी यांच्या हलगर्जीमुळे सैन्य परिवाराची फरफट


करमाळा प्रतिनिधी
हिसरे (ता. करमाळा): गावातील शेतकरी श्री. जोतिराम क्षीरसागर यांनी कोर्टाच्या स्पष्ट आदेशानुसार त्यांच्या मालमत्तेच्या ७/१२ उताऱ्यात दुरुस्ती नोंद करण्यासाठी मागील दोन वर्षांत पाच वेळा तहसील कार्यालय करमाळा व सर्कल कार्यालय,सालसे येथे लेखी अर्ज सादर केले. मात्र, अद्यापही कोणतीही दखल न घेता प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे.
विशेष म्हणजे, क्षीरसागर कुटुंबातील दोन्ही मुले भारताच्या संरक्षण सेवेतील जवान आहेत – एक पॅरामिलिटरी फोर्समध्ये राजस्थानात तर दुसरा भारतीय हवाई दलात पठाणकोट येथे कार्यरत आहे. वृद्ध आई-वडील शिक्षणाअभावी सरकारी प्रक्रिया समजून घेऊ शकत नसल्याने सरकारी दारात हेलपाटे मारत आहेत. तरीही जबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्षच करीत आहे.

"कोर्टाचा आदेश असूनही दुरुस्ती नोंद होत नसल्यामुळे आम्हाला आर्थिक व मानसिक त्रास होत आहे," असे श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.
या प्रकारामुळे महसूल प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सैन्यात कार्यरत जवानांच्या कुटुंबीयांची अशी फरफट होत असेल, तर सामान्य शेतकऱ्यांचे काय? या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा