Breaking

रविवार, २६ जुलै, २०२०

*रोटरी क्लब,टेंभुर्णी यांचे कडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ*


*रोटरी क्लब,टेंभुर्णी यांचे कडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर  सुशोभीकरण कामाचा शुभारंभ*

------------------------------------------ 


  टेंभुर्णी(प्रतिनिधी) रोटरी क्लब,टेंभुर्णी यांचे कडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर  सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आज दि 25 जुलै रोजी करण्यात आला.रोटरी क्लब,टेंभुर्णी यांचे वतीने या पूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली होती संबंधित टेंभुर्णी येथील पुतळा समितीच्या कार्यकर्त्यांनी सदर वृक्षरोपण हे  फोटो पुरते न राहता त्या वृक्षांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली.सदर कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत पाहून रोटरी क्लब ने आणखी एक पाऊल पुढे टाकत या ठिकाणी 1 ते 1.5 रुपये खर्च करून लॉन 'बाकडे व सुशोभीकरण करण्याचे ठरवले आहे.रोटरी क्लब,टेंभुर्णी चे नूतन अध्यक्ष शब्बीर जहागीरदार व सचिव बंडू रावळ यांच्या संकल्पनेतून हा प्रोजेक्ट रोटरी क्लब, टेंभुर्णी करणार आहे.या बद्दल पुतळा समितीच्या वतीने रोटरी क्लब टेंभुर्णी चे आभार मानण्यात आले.या वेळी रोटरी क्लब चे रमेश पाटील, नागेश बोबडे,विनोद शिंदे,प्रशांत गांधी,मुकुंद अटकळे,वैभव गांधी, अनिल बाबर,श्रीकांत लोंढे, सचिन होदाडे, संदीप मोकाशी,नागेश कल्याणी,महेश कोकीळ,दीपक व्यवहारे सर, पारस कटारिया आदी रोटरी सदस्य व परमेश्वर खरात,रमेश लोंढे,तात्यासाहेब खरात,संतोष खरात,शिवसेनेचे सुरेश लोंढे,ऍड.संतोष कानडे,प्रमोद गायकवाड  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा