Breaking

रविवार, २६ जुलै, २०२०

*शिराळ (टें) येथील युवकाचा शेवरे येथे निर्घृण खून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न*


*शिराळ (टें) येथील युवकाचा शेवरे येथे निर्घृण खून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न*
 ------------------------------------------ 

मयत - संजय काळे 
टेंभुर्णी प्रतिनिधी [aj24taas news ]
**************-**-*************
टेंभुर्णी : - माढा तालुक्यातील शिराळ (टें) येथील संजय मारुती काळे (वय-५२) या युवकाचा शेवरे (ता.माढा) येथे निर्घृणपणे खून झाल्याची घटना उघडकीस आली असून अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणावरून तीक्ष्ण हत्याराने खून करून मृतदेह जाळून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.ही घटना शेवरे येथे कॅनॉलच्या भराव्या च्या पायथ्याला रविवारी सकाळी ८.३० वा. सुमारास उघडकीस आली आहे.





याबाबत अधिक माहिती अशी की,शिराळ (टें) येथील संजय मारुती काळे हा काल शनिवारी रात्री ९ वा.सुमारास जेवण करून झोपण्यासाठी त्याच्या खोलीत गेला होता.यानंतर सकाळी तो घरातून गायब असल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास आले.त्याचा मोबाईल बंद होता.तसेच त्यांचा छोटा हत्ती टेम्पो ही गायब होता.यामुळे त्याची शोधाशोध सुरू होती.त्याचा फोन लागत नसल्याने त्याच्या पत्नीने टेंभुर्णी पोलीस ठाणे गाठून तो गायब असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.

हेच ते वाहण शेवरे येथे पेटवलेले

इकडे शेवरे येथे अकलूज-टेंभुर्णी रस्त्याच्या पूर्वेस उजनी कॅनॉलपासून अर्धा कि. मी.अंतरावर कॅनॉलच्या भराव्याखाली एक छातीच्या खालचा भाग पूर्णपणे जळालेल्या अवस्थेतील अनोळखी इसमाचा मृतदेह गावकऱ्यांना ८.३० वा.सुमारास दिसून आला.या ठिकाणी (एम.एच.४५-६५७७) या क्रमांकाचा टेम्पो ही पलटी केलेला होता.तर मृतदेहाच्या अंगावर एक टायर जळालेली स्टेफनी असा कौर्याची सीमा पार केलेला व बघता क्षणी घटनेने हृदय गोठवे अशा अवस्थेतील मृतदेह बघून या परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.या मृतदेहाचा छातीच्या खालचा संपूर्ण भाग जळून कोळसा झालेला होता व वरील चेहऱ्याचा भाग तेवढा वाचला होता.त्याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केलेले होते. 
ही घटना पाहून मारेकऱ्यांनी 
अगोदर त्यास मारून नंतर काटेरी बाभळीच्या काटक्यावर टाकून वरून टायरसह स्टेफनी अंगावर टाकून मृतदेह पेटवून दिला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान इकडे शिराळमध्ये संजय काळे याची शोधाशोध सुरू असताना शेवरे येथे मृतदेह मिळून आल्याची माहिती मिळताच काहीजणांनी तेथे जाऊन पाहिले असता तो मृतदेह संजय काळे याचाच असल्याचे निष्पन्न झाले.यामुळे संजय काळे याचा एवढ्या निर्दयपणे कोणी व का खून केला असा प्रश्न निर्माण होत आहे.मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन तो टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला.तेथे शिराळ (टें)  ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.


अर्धवट जळून राहीलेला मुत्यू देह पोलिसांनी ताब्यात घेतलेला 

शिराळ (टें) येथील रहिवासी संजय मारुती काळे हा त्याच्याकडील टेम्पो (क्र-एम.एच-४५ ६५७७) टेम्पोतून फिरून बेकरी पदार्थ विक्रीचे काम करीत असे.तसेच त्याचा पूर्वी सावकारकीचा ही व्यवसाय होता.त्यास शेती असून तो पत्नी,दोन मुले व सून यांच्यासह राहत होता.काल शनिवारी रात्री सर्वजन जेवण करून रात्री नऊ वा.झोपण्यासाठी तो एकटाच त्याच्या खोलीत गेला होता.संजय काळे याचा सुनियोजित खून कोणी व का केला असावा हे अद्याप स्पष्ट झाले नसून टेंभुर्णी पोलीसांना या खुनाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल हिरे,पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी भेट दिली आहे.
याबाबत संजय काळे याची पत्नी अंजना काळे यांनी फिर्याद दिली आहे असून फिर्याद दाखल झाला आसुन टेंभुर्णी पोलिस ठाणे गु.र.नं 471/2020 भा.द.वी.कलम 302,201 प्रमाने दाखल झाला असुन पुढील तपास पो.नि. राजकुमार केंद्रे तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा