निमगाव केतकी येथील बँकेच्या कॅशिअरची औषध प्राशन करुन आत्महत्या
इंदापूर पो. स्टे. गु. र. नं. व कलम ८२८ \ २०२० भा. द. वि. कलम ३०६, ५११, ३४ गु. घ. ने गुन्हा दाखल
इंदापूर प्रतिनिधी : शिवाजी पवार
निमगाव केतकी ( ता इंदापूर) येथील सांगोला अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेतील सुवर्णयुगेश्वर ग्रामीण बीगर शेती पतसंस्थेने मुदत ठेव ठेवलेल्या २० लाख रुपयांवर १८ लाख रुपये ठेव तारण कर्ज उचलल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बँकेतील कॅशियरनेच अपहार केल्याचे स्पष्ट होईल. या भितीने सांगोला अर्बन-को आपरेटीव बँकेचे कॅशिअर सतीश दशरथ शेंडे रा. निमगांव केतकी यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली असल्याचा प्रकार निमगाव केतकी (ता.इंदापूर ) येथे घडला असुन याबाबत पतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्या तीन जणांविरोधात फीर्याद मयत सतीश शेंडे याची पत्नी ज्योती सतिश शेंडे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दीली. असुन उपचारादरम्यान पतीचे निधन झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तपास पोलीस उपनिरीक्षक बिरप्पा लातुरे हे करीत आहेत
फिर्यादीत म्हटले आहे की, माझे पती निमगांव केतकी सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीस आहेत.१२ जुलै २०२० पासून ते १७ जुलै २०२० पर्यंत माझे पती यांना अण्णाजी कुलकर्णी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) तेजस हेगडे व निलेश गोविंद बनकर दोघे रा. निमगाव केतकी ता.इंदापूर यांचे माझ्या पतीला वेळोवेळी फोन येत होते .यांचा फोन येईल तसे माझे पती टेन्शनमध्ये यायचे सदर बाबत फोन वर बोलुन त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मला सांगितले की, अण्णाजी कुलकर्णी यांनी मला न माहीत होता सुवर्णयुगेश्वर पतसंस्थेचे तेजस हेगडे यांचेकडून २० लाख रुपयांची मुदत ठेव रकमेवर १८ लाख रुपये ठेव तारण कर्ज काढून घेतले आणि त्यांनी ३१ जानेवारी पासून काम सोडले होते.
त्याविषयी फिर्यादी यांचे पती यांना काहीच माहीत नव्हते. फीर्यादीचे पती हे बँकेत कॅशियर म्हणून काम करीत होते. त्यांनी कॅश काऊंटर मध्ये ठेवली होती ती वर वर कोणाकोणाला आरटीजीएस केले ही अफरातफर जेव्हा सोमवार दिनांक १३ जुलै २०२० रोजी उघडकीस आला. त्यावेळी त्याचे खापर फिर्यादीचे पती यांचेवरच फुटेल ही भीती फिर्यादीचे पती यांना सहन झाली नाही. तसेच निलेश बनकर यांचेकडे फिर्यादीचे पतीचे वैयक्तिक ८५ हजार रूपये गेले दोन वर्षापासून आहेत. या सर्वांच्या त्रासाला कंटाळून फीर्यादीच्या पतीने १७ जुलै २०२० रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी येथील वडापूरे पेट्रोल पंपाजवळ औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
वरील तीन लोकांनी असाह्य त्रास दिल्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या पतीने औषध प्राशन केले असल्याचे फीर्यादी यांना सांगितले त्यामुळे वरील तीनही आरोपीं विरुद्ध मयत सतीश शेंडे याच्या पत्नीने पोलीसात फीर्याद दीली आहे. दरम्यान सतीश शेंडे यांनी औषध प्राशन केल्यानंतर त्याला अकलूज ता. माळशिरस येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचे १९ जुलै रोजी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले.यातील दोन आरोपी निलेश बनकर व तेजस हेगडे यांना तातडीने अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बिराप्पा लातुरे हे करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा