*तांबवे (टें ) येथील माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गुरलिंग खटके यांचे कोरोनाने निधन*
------------------------------------------
*अकलुज येथील स्मशानभूमीत ग्रामपंचायतच्या वतीने उरकले अंत्यसंस्कार*
------------------------------------------
टेंभुर्णी [प्रतिनिधी
aj24taas maharashtra
टेंभुर्णी पासुन जवळ असलेल्या तांबवे [टें ] ता. माढा येथील रहिवाशी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गुरुलिंग बापू खटके (वय-76) यांचे आज सकाळी अकलूज येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोणाच्या आजाराने निधन झाले.
ते गेले एक महिन्यापासून अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त होते.त्यांच्यावर अकलूज येथे उपचार सुरू असताना सोमवारी रात्री त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. आज सकाळी 7.05 वा. त्यांची प्राणज्योत मालवली. गुरलिंग
बापू खटके हे तांबवे गावाचे आधारवड होते.तांबवे गावात सुखदुःखाचे कोणतेही कार्य बापू शिवाय पार पडत नव्हते.ते समाजकार्यात तरूणांना लाजवेल अशा उत्साहाने भाग घेत असत.तांबवे गावच्या जडणघडणीत बापूचा शब्द अंतिम मानला जात असे.
तालुक्याच्या राजकारणात त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद भुषविले होते.ते तांबवे (टें) विकास सोसायटीचे 25 वर्षे चेअरमन होते. समाजकार्यातील योगदानाबद्दल अरण येथे समाज गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.तांबवे गावातील सर्वाचे वडीलधारे जेष्ठ बंधू गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
गुरुलिंग[ बापू ]खटके यांनी आयुष्याभर तांबवे व पंचक्रोशीतील जवळपास 400 व्यक्तीचे अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले होते.अंत्यसंस्कार,तिसरा,दहवा,बारावा, तेरावा,मासिक,वर्ष श्राद्ध हे सर्व गुरलिंगबापू विधीवत सोपस्कारपणे पार पाडत असे.हे काम करताना ते संबंधित कुटुंबाला धिर देण्याचे काम करत होते.
ज्यांनी
आयुष्यभर दुसऱ्याचे अंत्यसंस्कार करण्याचे कार्य केले.मात्र त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी गावातील व घरातील कुणाही व्यक्तींना साधा हातही लावता आला नाही.याचे ग्रामस्थांना दुःख होत आहे.
आज सकाळी 8.30 वा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व नियमा नुसार अकलूज ग्रामपंचायतींच्या वतीने ठराविक नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले असुन तांबवे गावात एकाच घरात पाचजंणाना कोरोनाची लागन झाली आहे.आत्तापर्यंत एकूण नऊ जनांना आजाराची बाधा झाली असुन त्यामध्ये एकाचा मुत्यू झाला आहे तर काल वयस्कर व्यक्तीला त्रास होऊ लागल्यामुळे मंगळवारी चार वाजता अकलुज येथे खाजगी हाँस्पिटल येथे उपचार करून सोलापुर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर सात जण कुर्डूवाडी येथे कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा