अालेगाव (बु) गावात घरोघरी सर्वेक्षण व आरोग्य तपासणी मोहीम
-.अंजनादेवी पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
इंदापूर :प्रतिनिधी शिवाजी पवार
*AJ 24 Taas News Maharashtra YouTube channel*
अालेगाव ( बु ) येथे घरोघरी जाऊन सर्वेक्षण व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या सौ. अंजनादेवी शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोलापूर जिल्हा परिषद व माढा पंचायत समिती यांच्यामार्फत संपूर्ण अालेगाव ( बु ) येथे डाॅक्टर, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका व लॅब टेकनिशन यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ऑक्सी मीटर, पल्स मीटर व थर्मामीटरच्या साह्याने नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम सुरु केली आहे. एका दिवसांमध्ये सर्व गावाचे सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे.
या मोहिमेचा प्रारंभ करताना सौ. अंजनादेवी पाटील यांनी स्वतः आरोग्य तपासणी करून घेतली.एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीस कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्या कुटुंबातील सर्वानी कोरोनोची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन यावेळी अंजनादेवी पाटील यांनी केले.
ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षण आढळून येतील, त्या नागरिकांची स्वॅब टेस्टिंग करण्यात येणार आहे. जेणेकरून भविष्यात वाढणारा धोका टळेल व कोरोना नियंत्रणात येण्यास मदत होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी शिवाजीराव पाटील, सरपंच रविंद्र पाटील, डाॅ. नेहा देशमुख, डाॅ. नितीन देशपांडे, ग्रामसेवक लोकरे,अारोग्य सेवक काळे, नाळे, चव्हाण, कदम, डोंगरे, खोकले, झेंडे, चव्हाण, भोसले, गोसावी ( लॅब टेकनिशन ) व बहुसंख्येनी ग्रामस्थ उपस्थितीत होते.
यावेळी कोंढारभागातील काही गावामध्ये कोरोनाने शिरकाव केलेला अाहे तर काही गावामध्ये कोरोनाचा कसलाही शिरकाव झालेला नाही त्या सर्व गावाचे अभिनंदन करण्यात अाले. परंतु कोरोनाअाजुन वाढु नये म्हणुन ही जनजागृती होणे गरजेचे अाहे. असे शिवाजीराव पाटील ( माजी संचालक, सोलापूर जिल्हा दुध संघ ) यांनी अवाहन केले अाहे.
_________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा