Breaking

रविवार, २० सप्टेंबर, २०२०

टेंभुर्णी पोलिसांनी कारवाई केलेल्या वाहनांचे चक्क पोलिस ठाण्यातून गेले स्पेअर पार्ट चोरीला****** AJ 24 Taas News Maharashtra


*टेंभुर्णी पोलिसांनी कारवाई केलेल्या वाहनांचे चक्क पोलिस ठाण्यातून गेले स्पेअर पार्ट चोरीला*
*******************************

टेंभुर्णी/प्रतिनिधी
AJ 24 Taas News Maharashtra

टेंभुर्णी (प्रतिनिधी) टेंभुर्णी पोलीस स्टेशन सध्या एका वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आले असून एका जप्त केलेल्या मोटरसायकल ची दोन्ही चाक चक्क पोलिसांच्या ताब्यातून चोरट्यांनी चोरून नेल्याने कोर्टाचा आदेश झालेले वाहन वाहन मालकाच्या ताब्यात कसे द्यायचे हा प्रश्न पोलिसांना पडला असून तोपर्यंत दुसऱ्या जप्त केलेल्या वाहनाची चाकं काढून  घेऊन जा असा आदेश मालकाला दिल्याने चक्क पोलीसच चोरी करण्याचे सांगत असल्याने त्याला हसावे की रडावे हेच कळत नाही. परंतु हा मजेदार किस्सा सध्या टेंभुर्णी शहराच्या चौकाचौकात चवीने चघळला जात असून पोलिसांची मात्र संपूर्ण टेंभुर्णी शहरामध्ये व परिसरात बेअब्रू झाल्याने आता वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. सदर घटनेचा सविस्तर वृत्तान्त असा की लॉक डाऊन च्या काळात कोरोना चा प्रभाव व प्रसार रोखण्यासाठी जिल्हाबंदी असल्याने जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या लोकांना पोलीस ताब्यात घेऊन त्यांना कोरनटाईन होण्याचे आदेश देत होते. जिल्हा बंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करून त्याचे वाहन जप्त करून त्याचे वाहन पोलिसांच्या ताब्यात पोलीस स्टेशनच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेराच्या नजरकैदेत लावले जात होते . असे असताना वाहनांच्या सामानाची व चक्क मोटरसायकलच्या दोन्ही चाकाची चोरी झाल्याने "चोराला कोतवाल सामील" असा प्रत्यय टेंभुर्णीकराना येत आहे. लातूर येथील समाधान ज्ञानोबा पानखेड राहणार नागोली ता. लातूर जिल्हा लातूर यांची मोटर सायकल बजाज डिस्कवर MH 14 /DB 0787 पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली होती . परंतु नंतर माढा कोर्टाने पोलिसांना त्याचे वाहन परत देण्याचा आदेश केला हा आदेश घेऊन तो आपली गाडी ताब्यात घेण्यासाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला आला . परंतु पोलिसांनी त्याला त्याची मोटारसायकल दोन्हीचा काढून घेऊन त्याच्या ताब्यात दिल्याने त्याला जबर धक्का बसला. त्याने पोलिस स्टेशनला याबाबत विचारणा केली असता त्याला तिथल्या दुसऱ्या एखाद्या मोटरसायकलची चाक काढा आणि तुमची गाडी चालू करून आहे अशी घेऊन जा असा आदेश दिले त्याने सदरची तक्रार तेंभूर्णी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली परंतु या प्रकाराने वरिष्ठ अधिकारीही चक्रावून गेल्याने आता पुढे काय होणार याकडे टेंभुर्णी करांचे लक्ष लागून राहिले आहे .  
टेंभुर्णी पोलीस ठाण्यांमध्ये सर्वत्र सी सी टीव्ही कॅमेरे असताना सुद्धा टेंभुर्णी पोलीस ठाण्यात च चोऱ्या होत असतील तर पोलीस जनतेचे काय रक्षण करणार. सीसीटीव्ही कॅमेरे दिखाव्यासाठी आहेत की काय. टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्वसामान्य जनतेची कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत साधी यांची दाखल करायचे असेल तरीही चक्क सीसीटीव्ही कॅमेरा समोर पोलिस पैसे घेताना दिसून येतात त्यामुळे पाहणाऱ्याला हे कॅमेरे चालू आहेत की बंद असा प्रश्न पडतो. या कॅमेरे चे फोटोज कधीही तपासली जाते की नाही वरिष्ठ अधिकारी भ्रष्ट पोलिसांवर काय काय कारवाई करतात अशी चर्चा टेंभुर्णी करान मध्ये होत असून पैसे घेण्यासाठीच कदाचित हे कॅमेरे बंद असावेत असेही जनतेतून बोलल्या जाते जिल्हा पोलिस अधिकारी (ग्रामीण) या प्रकरणाकडे कशा पद्धतीने पाहतात संबंधित अधिकाऱ्यांवर व ठाणे अंमलदार यांच्यावर काय कारवाई करतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्या दिवसापासून चे सर्व सीसीटीव्हीचे फुटेज चेक करून चोराला ताब्यात घ्यावे त्याचबरोबर टेंभुर्णी पोलीस स्टेशन मधील सर्व भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा