Breaking

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड व व नव्यदिशा संस्था यांच्या वतीने टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे मास्क व सँनीटायझरचे वाटप*




*

*क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड व व नव्यदिशा संस्था यांच्या वतीने  टेंभुर्णी पोलीस स्टेशन  येथे मास्क व सँनीटायझरचे वाटप*

टेंभुर्णी (प्रतिनिधी)
जगामध्ये  कोरोना  धुमाकूळ घातला असून  याचाच परिणाम  म्हणून महाराष्ट्रात  मोठ्या प्रमाणावर कोरोना पसरला असून   मुंबई पुणे नंतर सोलापूर जिल्ह्यात  ग्रामीण भागातही  कोरोना चे वाढते पेशंट पाहता रात्रंदिवस समाजाची सेवा करणारे पोलीस प्रशासन असेल पत्रकार असतील व   स्वयंसेविका  असतील यांना  ही  मोठ्या प्रमाणावर कोरोना ची लागण होत असल्याचे दिसून येत आहे.
 त्यामुळे कोरोना व्हायरसचा  प्रसार झपाट्याने होत असताना सोलापुर जिल्ह्यातील  लोकांची सेवा पोलीस प्रशासन करत आहेत .
या कोरोना विरोधात लढा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड आणि नव्यदिशा संस्था यांच्यातर्फे पोलीस प्रशासन यांना सहकार्य  करण्याचा मानस ठेवून टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे  पोलीस निरीक्षक मा. राजकुमार केंद्रे यांच्याकडे मास्क व सँनीटायझर सुपूर्द संस्थेच्या वतीने करण्यात आले .
हे मदतीचे कार्य करत असताना पोलीस प्रशासन यांच्याकडून सहकार्य मिळाले  व सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड चे अधिकारी संजय द्वासे, मा. गजभरे सर व नव्यदिशा संस्थेचे विकास अधिकारी गणेश भाले, यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा