Breaking

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

*वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहिर:-*


*वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहिर:-*


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

सबंध भारतामध्ये अग्रेसर असणारी चळवळ विद्यार्थ्यांच्या न्यायहक्कासाठी सदैव तत्पर असणारे संघटन म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या संघटनेकडे पाहिलं जातं त्या वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या नांदेड जिल्हा कार्यकारिणीची बैठक मराठा विद्यार्थी वसतिगृह येथे वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रवीण जाधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार  पडली...
  या बैठकीमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.व पुढील विद्यार्थी उपयोगी आंदोलनाच्या दिशा ठरवण्यात आल्या.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये नांदेड महानगराध्यक्षपदी निशिकांत धोंडगे जिल्हा सचिव गोविंद गावे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश कदम हनुमंत कोल्हे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
बैठकीचे सूत्रसंचालन प्रा.ज्ञानेश्वर शिंदे हरबळकर यांनी केले या बैठकीस संभाजी ब्रिगेडचे अंकुश कोल्हे एम पी एस सी अभ्यासक शहाजी कदम उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा