Breaking

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

भादे गावाचा चौफेर विकास करणार -पंचायत समिती सदस्या शोभाताई जाधवयांचे प्रतिपादनAJ 24 Taas News Maharashtra



भादे गावाचा चौफेर विकास करणार -
पंचायत समिती सदस्या शोभाताई जाधव
यांचे प्रतिपादन
AJ 24 Taas News Maharashtra
सुशिल गायकवाड/खंडाळा.
खंडाळा प्रतिनिधी दि.08
भादे गावाने राजकारण व समाजकारण करत असताना मला नेहमी साथ दिली आहे.त्यामुळे यापुढे ही भादे गावाचा चौफेर विकास करणार असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती सदस्या शोभाताई जाधव यांनी विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी केलेले आहे.त्या खंडाळा तालुक्यातील भादे या गावात कामाच्या शुभारंभ 
निमित्ताने संवाद साधताना लोकांशी बोलत होत्या.तसेच त्यांनी भादे गावच्या विकासाठी कायम कटिबद्ध असल्याचे दाखवून दिले आहे.याबद्दल लोकांनी ही त्यांच्या कार्य पध्दतीवर विशेष समाधान व्यक्त केलेले आहे.

नुकतेच भादे येथे खंडाळा पंचायत समितीच्या सदस्या शोभाताई जाधव यांच्या शेष फंडातून विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे.यावेळी भादे येथील पेव्हर ब्लॉक बसविणे व गटर बांधकाम करणे या कामाच्या शुभारंभ प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.पंचायत समिती सदस्या शोभाताई जाधव यांच्यासह भादे गावचे नेते तानाजीराव साळुंखे, माजी संचालक खरेदी-विक्री संघ बाळासाहेब साळुंखे ,माजी ग्रामपंचायत सदस्य बापुकाका साळुंखे, लहुजी शक्ती सेना सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव,माजी उपसरपंच दिपक जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.तसेच यावेळी या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी दळवी, बापूराव साळुंखे, शिवाजी साळुंखे, खंडू जाधव, ज्ञानदेव जाधव, जगन्नाथ जाधव, हणुमंत सोनावणे, शंकर जाधव, दत्तात्रय साळुंखे, पोपट जाधव, महेश साळुंखे, बाबुलाल खुंटे, बाळासाहेब खुंटे, विजय जाधव, दिपक जाधव, लालासाहेब जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी सुरज चव्हाण, तानाजी जाधव आदी लोक व ग्रामस्थ उपस्थित होते.

-भादे ता.खंडाळा येथे पंचायत समिती सदस्या शोभाताई जाधव यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.
(छाया-सुशिल गायकवाड,भादे )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा