*करमाळ्यात शिवसृष्टी करण्याची हाजी उस्मानशेठ तांबोळी यांची मागणी*
*AJ 24 Taas News Maharashtra
*करमाळा प्रतिनिधी/अतुल वारे पाटील *
करमाळा शहर हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून येथे राज्यातून पर्यटक येतात त्यामुळे या ऐतिहासिक करमाळा नगरीत भव्यदिव्य शिवसृष्टी साकारण्याची मागणी पुणे शहर काँग्रेस आय चे उपाध्यक्ष व सकल मुस्लिम समाजाचे करमाळा अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
ताबोंळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती येथे शिवसृष्टी करणार असुन त्याच धर्तीवर करमाळा तालुक्यात शिवसृष्टी उभी करावी . करमाळा शहराच्या लगत श्री कमलादेवी चे मंदिर आहे तर करमे मौला शरीफ यांचा दर्गाह ,फिरंगाई मातेचे मंदिर आहे. तर पोथरे येथे शनीमंदिर ,संगोबा येथे आदिनाथ महाराज मंदिर असा प्रचंड ऐतिहासिक ,धार्मिक ठेवा करमाळा नगरीला लाभला असून याच्या जोडीला महाराष्ट्र शासनाने करमाळ्यात शिवसृष्टी केल्यास करमाळा शहर व तालुक्यात पर्यटनस्थळामुळे आर्थिक रोजगार उपलब्ध होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल व करमाळ्याचा उत्कर्ष होईल , त्या मुळे अजितदादा यांनी विशेष बाब म्हणून करमाळा शहरा जवळ शिवसृष्टी मंजूर करावी अशी मागणी केली आहे या निवेदनाच्या प्रती आमदार रोहीत पवार, करमाळा तालुक्याचे आमदार संजय शिंदे,जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठविण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा