*विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची अतिवृष्टी भागाची पाहणी दौऱ्यात आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्यालयास धावती भेट.*
*बार्शी प्रतिनिधी सिद्धेश्वर जाधव
*दि. 14 ऑक्टोबर रोजी बार्शी शहर व तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे, शेती उपकरणे, शेती अवजारे, पाझर तलाव, बंधारे यांचे झालेले नुकसान तसेच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तू, संसारोपयोगी वस्तू, घरांची झालेली पडझड, व्यापा-यांच्या दुकानात पाणी शिरून दुकानातील साहित्य आदींचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीचे निवेदन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देताना आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी, बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा