Breaking

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

लोणंदमध्ये साथ प्रतिष्ठाणच्या वतीने सत्कार व निवडीचा कार्यक्रम संपन्न



लोणंदमध्ये साथ प्रतिष्ठाणच्या वतीने सत्कार व निवडीचा कार्यक्रम संपन्न


सुशिल गायकवाड/लोणंद.



सामाजिक क्षेत्रात युवकांची एक नवखी फळी या क्षेत्रात आणण्याच्या उद्देशाने साथ प्रतिष्ठाण या सामाजिक संघटनेचे वतीने कामाचा विस्तार वाढवणे विषयी पावले उचलत लोणंद येथील आयोजित छोट्याखाणी कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या हस्ते साथ प्रतिष्ठाण वतीने खंडाळा व फलटण तालुक्यातील निवडी जाहिर करत खंडाळा तालुका संपर्क प्रमुख पाडळी येथील मोहन बोरकर, तालुका पश्चिम विभाग पदी बावडा खंडाळा येथील मोहित पवार, तालुका सरचिटणीस पदी पळशी मिरजे येथील अनिश पठाण, फलटण तालुका कार्याध्यक्ष पदी अमोल कोळेकर या नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्रे देऊन पदभार देण्यात आला. 

याप्रसंगी लोणंद चे सुपुत्र कवी दिपक क्षीरसागर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद च्या खंडाळा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तसेच ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल साथ प्रतिष्ठाण वतीने जाहीर सत्कार करण्यात आला तसेच दैनिक धैर्य टाईम्स च्या खंडाळा तालुका प्रतिनिधी पदी साथ प्रतिष्ठाण चे सचिव मंगेश माने यांना नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. 

या कार्यक्रमास दैनिक धैर्य टाईम्स चे संस्थापक सचिन मोरे, इडिटर इंद्रजित माने, कायदेशीर सल्लागार अॅड.विलायत उर्फ बबलूभाई मणेर साहेब,पुरोगामी मुस्लिम युवक संघटनेचे अध्यक्ष शफिभाई इनामदार, रेहबर-ए-जरिया फौंडेशन चे खंडाळा तालुका अध्यक्ष शौकत शेख, सामाजिक कार्यकर्ते बबलू पवार, साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला, सचिव मंगेश माने, उपाध्यक्ष दिपक बाटे, खजिनदार सचिन चव्हाण, मुख्य कार्यकारिणी सदस्य सुनील रासकर, संतोष राऊत खंडाळा तालुका कार्याध्यक्ष ओंकार रासकर, संतोष मालुसरे आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे मास्क वाटप करुन स्वागत करण्यात आले, स्वागत व सुत्रसंचलन अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी केले, प्रास्ताविक कायदेशीर सल्लागार अॅड.विलायत मणेर साहेब व आभार खंडाळा तालुका कार्याध्यक्ष ओंकार रासकर यांनी केले. याप्रसंगी युवक बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा