किनवट बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने हाथरस अत्याचाराच्या निषेधार्थ रॅली...
नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
आज दिनांक 15/10/2020 रोजी मा.वामन मेश्राम राष्ट्रीय सयोजक बहूजन क्रांती मोर्चा यांच्या आदेशा नुसार बहूजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून बहिण मनिषा वाल्मीकी हाथरस आत्याचाराच्या निहषेधार्थ किनवट येथे बहुजन क्रांती मोर्चा युनिट तर्फे हाथरस येथील अत्याचाराच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली.
रॅली,डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासुन अन्नाभाऊ साठे,महात्मा ज्योतिबा फुले,छञपती शिवाजी महाराज,राष्ट्रमाता जिजाऊ चौक क्रांतीसूर्य बिरसा मुंंडा चौक ते उपविभागीय कार्यालय किनवट येथे निवेदन देऊन रॅली समाप्त करण्यात आली...
यावेळी बहुजन क्रांती मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष उमराव साळवे,भारत मुक्ती मोर्चा तालुकाध्यक्ष गोविंदराव खंडोजी बोडके,लहुजी क्रांती मोर्चा तालुकाध्यक्ष दयानंद प्रल्हाद काळे,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद तालुकाध्यक्ष सिरपती शंकर भूरके,बहुजन मुक्ती पार्टी तालुकाध्यक्ष संतोष माधवराव अडकिने,क्रांती ज्योती सावित्री फुले विचार मंच तालुकाध्यक्षा सुभागी प्रशांत ठमके,अशोक लोभाजी सिंगनकर भारत मुक्ती मोर्चा किनवट तालुका उपाध्यक्ष भास्कर अर्जुन राऊत भारत मुक्ती मोर्चा किनवट तालुका सचिव
शेख मेहबूब शेख जी बि एम पी किनवट तालुका उपाध्यक्ष रमेश गेडाम आदिवासी एकता परिषद जिल्हाध्यक्ष भिवाजी माजळकर आदिवासी एकता परिषद व इतर कार्यकर्ते बहुजन समाजातील परीवर्तनवादी चळवळळीतील विविध संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते व बहूजन बंधु भगिणी उपस्थित होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा